फलटण प्रतिनिधी -
२५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघासाठी दिनांक २२.१०.२०२४ रोजी २३ उमेदवारी अर्जाचे विक्री झाली असून दोन जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन सचिन ढोले यांनी दिली.
मौजे विडणी येथील हरीभाऊ रामचंद्र मोरे यांनी व सांगवी येथील रविंद्र रामचंद्र लांडगे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
फलटण -कोरेगाव हा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. दिनांक २२ ऑक्टोबर पासून २९ ऑक्टोबर रोजी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल तर दि ४ नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल दिनांक २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येईल अशी माहिती यावेळी ढोले यांनी दिली.