श्रीरामचे चेअरमन व सचिव यांचे बंद केलेले मानधन पुन्हा अनधिकृतरित्या सुरू केले असून ते मानधन बंद करण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संस्थेचे सभासदत्व रद्द करण्यात यावे, सभासदांना कर्ज वाटप करताना चेअरमन व सचिव यांच्या मर्जीतील लोकांनाच कर्ज दिले जाते तर इतर सभासदांना वेळेवर कर्ज दिले जात नाही, मुदत ठेवीवरील व्याजदर वाढ त्वरित रद्द करण्यात यावी, कर्जावरील नियमबाह्य व्याजदर वाढ त्वरित रद्द करण्यात यावी, संस्थेकडे असणाऱ्या ठेवी व ठेवीदार यांची माहिती मिळावी
फलटण (प्रतिनिधी )
येथील श्रीराम वीज कामगार सहकारी पतसंस्थेतील मनमानी कामकाजाला कंटाळत पतसंस्थेतील सभासद यांनी विविध विषयांची माहिती मिळावी त्यांचबरोबर संस्थेमध्ये सभासद वाढ करण्यात यावी या मुख्य मागणीचे पत्र श्रीराम विज कामगार सहकारी पतसंस्था संघर्ष समितीच्या वतीने संस्थेचे चेअरमन, सचिव व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण यांच्याकडे दिले आहे.
या मागणी पत्रात विविध कामकाजावर सभासदांनी आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये असे म्ह्टले आहे की, संस्थेचे चेअरमन व सचिव यांचे बंद केलेले मानधन पुन्हा अनधिकृत रित्या सुरू केले असून ते मानधन बंद करण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संस्थेचे सभासदत्व रद्द करण्यात यावे, सभासदांना कर्ज वाटप करताना चेअरमन व सचिव यांच्या मर्जीतील लोकांनाच कर्ज दिले जाते तर इतर सभासदांना वेळेवर कर्ज दिले जात नाही, मुदत ठेवीवरील व्याजदर वाढ त्वरित रद्द करण्यात यावी, कर्जावरील नियमबाह्य व्याजदर वाढ त्वरित रद्द करण्यात यावी, संस्थेकडे असणाऱ्या ठेवी व ठेवीदार यांची माहिती मिळावी, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील इच्छुकांना सभासद करून घेण्यात यावे, कार्यक्षेत्रातील सभासदा करिता अर्ज केल्यास त्यांना सभासद करून घेण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
श्रीराम वीज कामगार सहकारी पतसंस्था संघर्ष समिती, फलटण यांच्या वतीने श्रीराम वीज कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित,फलटणचे चेअरमन व सचिव तसेच इतर संचालकांना निवेदन देतेवेळी श्रीराम वीज कामगार सहकारी पतसंस्था संघर्ष समिती फलटण यांचे प्रमुख पदाधिकारी शरद मोहन मोरे, महेश सोनवलकर, तानाजी मुळीक, राजेश भालेराव, कैलास मठपती,प्रमोद भगत,तानाजी पवार व इतर इतर मान्यवर यावेळी उपास्थित होते.

















