2 ऑक्टोबर 2022:
दुधेबावीचे ग्रामदैवत भवानी माता मंदिर येथे श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर (अध्यक्ष, सॅटॅलाइट रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क फलटण) यांनी आज सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी मंदिराचा परिसर फिरून माहिती घेतली. सॅटेलाइट रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क फलटण यांच्या माध्यमातून मंदिराच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. बिहार ऑफ पॅटर्न या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरात चालू असलेले विविध वृक्षांचे संगोपन आणि त्यामधून मंदिराच्या परिसरात वाढत असलेली वृक्षांची संख्या त्याबद्दल त्यांनी या उपक्रमाचे खास कौतुक केले. या ठिकाणी पाण्याच्या कायम उपलब्धतेबाबत तसेच स्वच्छता राखण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.भविष्यात भवानी माता मंदिर परिसरासाठी गरजेनुसार सहकार्य करण्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. सत्यजित राजे यांनी भवानी माता देवीची आरती सह दर्शन घेतले.
यावेळी दुधेबावी गावच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर,बिहार ऑफ पॅटर्नचे सचिन सोनवलकर,कृषीमार्गदर्शक संजय सोनवलकर यांचे वतीने रोपटे देऊन श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी गोविंद डेअरीचे डॉ. गायकवाड साहेब,सॅटॅलाइट रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क फलटणचे सदस्य डॉक्टर महेश बर्वे, श्री रामदास कदम, श्री प्रताप दादा निंबाळकर, रणजित निंबाळकर, गिरवी गावचे कृषी सहाय्यक सुनील सोनवलकर आदी उपस्थित होते.