वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे :
बिचुकले गावचे आदर्श सरपंच प्रशांत पवार यांची सरपंच परिषदेच्या कोरेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे :
प्रशांत पवार हे वेगवेगळ्या माध्यमातून सामजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांनी विद्यालय, महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक चालू केली, गावामध्ये दर आठवड्याला श्रमदान घेतले जाते, गावातील गोरगरिबांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, व्यवसायाला चालना मिळावी म्हणून युवकांना व्यवसाय वाढीचे मार्गदर्शन करणे असे अनेक समाजहिताचे उपक्रम राबवणामध्ये आदर्श सरपंच प्रशांत पवार यांची मोलाची कामगिरी आहे
सरपंच परिषदेच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी बिचुकले गावचे आदर्श सरपंच प्रशांत पवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली
गेली कित्येक वर्ष प्रशांत पवार हे वेगवेगळ्या माध्यमातून सामजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांनी विद्यालय, महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक चालू केली, गावामध्ये दर आठवड्याला श्रमदान घेतले जाते, गावातील गोरगरिबांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, व्यवसायाला चालना मिळावी म्हणून युवकांना व्यवसाय वाढीचे मार्गदर्शन करणे असे अनेक समाजहिताचे उपक्रम राबवणामध्ये आदर्श सरपंच प्रशांत पवार यांची मोलाची कामगिरी आहे. आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहांमध्ये सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमा वेळी प्रशांत पवार यांची कोरेगाव तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गोरगरिबांच्या हाकेला धावणारा हक्काचा माणूस म्हणून प्रशांत पवार यांच्याकडे पाहिले जाते तसेच उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिक प्रशांत पवार यांच्याकडे आदराने पाहतात. शेवटच्या घटकापर्यंत कुणीही विकासापासून वंचित राहू नये म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये प्रशांत पवार यांचा एक वेगळाच हातखंडा आहे. आज त्यांना या मिळालेल्या निवडबद्दल कोरेगाव तालुक्यामधील तसेच सातारा जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.