फलटण | धैर्य टाईम्स | ११ जानेवारी २०२५
फलटण तालुक्यातील मौजे आळजापुर ग्रामपंचायत येथे दारूबंदी होण्यासाठी महिलांचे मतदान सुरु झाले असून एकूण मतदार संख्या 723 आहे. आता पर्यंत 194 मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी दिली.
सदर मतदान आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आळजापुर येथे होत आहे. महिला मतदारांचे मतदान संपन्न होत आहे. याची मतमोजणी त्याच ठिकाणी आज सायंकाळी 6 वाजल्यापासून होणार आहे.