Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

आंबेडकरी चळवळीतील युथ आयकॉन : सिद्धार्थ प्रबुद्ध

टीम : धैर्य टाईम्स

आंबेडकरी चळवळीतील युथ आयकॉन : सिद्धार्थ प्रबुद्ध 

फलटणच्या आंबेडकरी चळवळीला एक दैदिप्यमान इतिहास आहे.परंपरा आहे.याच परंपरेला पुढे घेऊन जाणारा तरुण म्हणजेच सिद्धार्थ प्रबुद्ध. २३ एप्रिल १९३९ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी फलटण मध्ये “ प्रजा परिषद “ घेतली होती . तेव्हा पासून फलटण आंबेडकरी चळवळीचे केंद्र झाले आहे. महाराष्ट्रात कुठेही होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात विविध मार्गाने आंदोलन करण्यासाठी पहिली मशाल फलटण मधून धगधगते.यासाठी आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. सन २००५ धम्मचक्र प्रवर्तन सुवर्ण महोत्सवी वर्षापासून सुरू झालेल्या कार्यक्रमात सिध्दार्थने विद्यार्थीदशेपासून (वय १७) स्वयंसेवक म्हणून कार्यास सुरूवात केली. याकाळातील सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात “आम्ही बौद्ध का झाले?” या बाबासाहेबांच्या धम्मदिक्षेच्या ऐतिहीसिक भाषणाचे सिद्धार्थच्या आवाजात ओडीओ सिडी प्रकाशित झाली. तसेच धम्मयान चौकातील झालेल्या नाट्य कार्यक्रमात बाबासाहेबांची भूमिका केली. वर्षभर, ३६५ दिवसाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषण वाचन कार्यक्रमाची व्यवस्था, यात समाजातील अभ्यासू व्यक्तींची रोज ऐकलेले आंबेडकरी विचार, यामुळे आंबेडकरी साहित्य वाचण्याची व कार्य करण्याची आवड त्याच्यात निर्माण झाली. यावेळी शिक्षणातील राखीव जागा बंद करण्याचे शासनाचे धोरण ठरले होते या विरोधात राष्ट्रपतीना हजारो संह्यांचे निवेदन दिले होते.सुवर्ण महोत्सवी वर्षानंतर 'दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे' हे अभियान सुरू झाले.या मध्ये बाबासाहेबांनी केलेल्या भाषणांचे वाचन व त्यांवर आधारीत चर्चांमध्ये सिद्धार्थने स्वयंसेवका बरोबरच अभ्यासपूर्ण विचार मांडायला सुरूवात केली. तसेच १४ वर्षे सुरू असलेल्या दर रविवारच्या कार्यक्रमाचे नियोजन, सुत्रसंचालन केले.  

 आंबेडकरी प्रजा परिषद व AIM 

 पाच वर्षाच्या आंबेडकरी संस्कारातून सिद्धार्थ कार्यकर्ता म्हणून सिद्धार्थ प्रबुद्ध तयार झाला. त्याने मित्रांना सोबत घेऊन बाबासाहेबांच्या फलटण भेटीच्या वर्धापन दिनी २३ एप्रिल २००९ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर इग्नायटेड मिशन ची सुरूवात केली. तर २३ एप्रिल २०१० रोजी आंबेडकरी प्रजा परिषद घेतली या परिषदेला महाराष्ट्रील काना कोपऱ्यातून हजारो आंबेडकरी बांधव उपस्थित होते. परिषदेमध्ये सिद्धार्थच्या “ भिमस्फूर्ती” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हापासून सलग १२ वर्ष ही परिषद सुरु आहे. यामध्ये आदर्श व्यक्ती, संस्था व भीमजयंती मंडळांना पुरस्कार देण्यात येतो.

रचनात्मक कार्याला सुरूवात :

अन्यायाच्या प्रतिकारासाठी आणि न्याय मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने आवश्यक असतातच. याबरोबरच समाजात आंबेडकरी वैचारिक आणि रचनात्मक कार्य उभी राहिली पाहिजेत म्हणून सिद्धार्थने AIM च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दरमहिन्याला क्लास वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम सुरू केले.सोबतच स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्र सुरू केले; त्यासाठी लायब्ररी सुरू केली.याबरोबरच मोफत कंप्युटर सेंटर सुरू केले. तसेच आंरराष्ट्रीय बौद्ध परिषद फलटणमध्ये घेतली. इयता १० वी विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यास वर्ग यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्काराचे कार्यक्रम घेतले. आंबेडकरी वह्या प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू केला. 

साप्ताहिक कालमान या आंबेडकरी चळवळीच्या वर्तमानपत्राचे उपसंपादक म्हणून सन २००९ ते २०१२ पर्यंत कार्य केले.फलटणची आंबेडकरी चळवळ आंतरराष्ट्रीय सत्तरावर पोहचण्यासाठी वेबसाईट सुरू केली.

फलटणची चळवळ परदेशापर्यंत :

सिद्धार्थने फलटणची आंबेडकरी चळवळ सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यात पोहचली होती. आता ती महाराष्ट्र व देशाबाहेर पोहचवण्यासाठी परदेशी शिक्षण स्काॅलरशिप मिळवून इंग्लंड येथे उच्चशिक्षणासोबत सामाजिक कार्यास सुरूवात केली.

लंडनमधील बाबासाहेबांचा बंगला महाराष्ट्र शासनाने घ्यावा यासाठी यशवी प्रयत्न :

सिद्धार्थ शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या नंतर शिक्षणा बरोबरच आंबेडकरी बांधवांच्या भेटी त्याने घेऊन अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले. सिद्धार्थचे कार्य, आवड, कार्याची पद्धत बघून लंडनमधील टी व्ही चॅनल वर त्याची दोन वेळा मुलाखत झाली. हा फलटणच्या चळवळीचा गौरव म्हणावा लागेल.भारतीय दुतावासातील शासनाच्या विविध कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग घेतला.सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेब इंग्लंडमध्ये असताना ज्या घरात दोन वर्षे वास्तव्यास होते ते घर भारत सरकारच्या ताब्यात येण्यासाठी खरेदी करावे म्हणून राज्यशासनाशी पत्र व्यवहार केला.त्यावेळी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री इंग्लंड दौऱ्यावर असतांना सिद्धार्थाने तेथील स्थानिक कार्यकर्त्यांसह मंत्र्यांची भेट घेतली. शासन घर खरेदी करणार असे मंत्र्यांनी जाहीर केले. त्याची बातमी व फोटो टीव्हीवर दाखवंण्यात आली यात मंत्र्यांसोबत सिध्दार्थचा प्रमुख फोटो देण्यात आला.घर खरेदीची गतीने हालचाल झाली व पंतप्रधानांनी त्याचे उदघाटन केले. 

शिक्षण पूर्ण करून मायदेशी आल्यानंतर सिद्धार्थने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यसाठी परदेशी शिक्षणासाठी कार्यक्रम घेतले.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी तयारी करू लागले . पण ५० विद्यार्थ्यांनाच स्काॅलरशीप मिळत असल्याने अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढवावी म्हणून प्रयत्न केला त्यास यश येऊन ७५ विद्यार्थ्यांना स्काॅलरशिप मिळू लागली.सिद्धार्थ आज तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करत असतो. तर राज्यातील अनेक पालक व विद्यार्थी प्रत्यक्ष भेटत असतात.

आज सिद्धार्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचा अध्यक्ष आहे. त्याने मंडळाची लायब्ररी सुरू केली आहे. ज्यामध्ये २ हजार पुस्तकांचा संग्रह आहे.अशा पद्धतीने गल्ली ते आंतरराष्ट्रीय पातळीवर फलटणची आंबेडकरी चळवळ पोहचवणारा सिद्धार्य अत्यंत नियोजनबद्ध रचनात्मक कार्य करणारा हा कार्यकर्ता आज आंबेडकरी तरुणांचा युथ आयकॉन बनला आहे.

सिद्धार्थ प्रबुद्ध चा लहान भाऊ मिलिंद हा ही त्याच्या कार्याने प्रभावीत झाला आहे. त्याच्या प्रयत्नामुळेच तो सुद्धा परदेशात शिक्षण घेऊन सामाजिक कार्यात सहभागी होत आहे. 

आज ५ ॲागस्ट सिद्धार्थचा वाढदिवस त्या निमित्त त्यास वाढदिवसाच्या मनापासून सदिच्छा।

मिलिंद दत्ता अहिवळे (Msc-Financ-UK)

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER