गोडोली गावाची यात्रा दरवर्षी उत्साहाने साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा शिरकाव गोडोलीत होवू नये, याची काळजी घेण्यासाठी यंदा गोडोलीची यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गोडोली यात्रा कमिटी आणि शहर पोलीस ठाणे यांच्या बैठकीत झाला. गोडोलीचे देवस्थान भैरवनाथाचे मानकरी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी ही माहिती दिली.
सातारा : सातारा शहरातील गोडोली या भागात दरवर्षी मोठया उत्साहाने पुर्वीपासून पंरपरेप्रमाणे गोडोली गावाची यात्रा साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर कायम आहे. या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. ती टाळण्यासाठी व कोरोनाचा शिरकाव गोडोलीत होवू नये, याची काळजी घेण्यासाठी यावर्षीची गोडोलीची यात्रा रद्द करण्यात येत आहे. तसा निर्णय गोडोली यात्रा कमिटी आणि शहर पोलीस ठाणे यांच्या बैठकीत झाला असल्याची माहिती गोडोलीचे देवस्थान भैरवनाथाचे मानकरी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी दिली.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या उपस्थितीत व गोडोली देवस्थान समितीचे व यात्रा कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस जवान राहुल खाडे, यात्रा कमिटीच्यावतीने शेखर मोरे-पाटील, अशोक मोरे-पाटील, सुनील मोरे-पाटील, पोपट मोरे, परशुराम मोरे, प्रमोद मोरे, बाळासाहेब मोरे-पाटील, शशिकांत मोरे, रमेश मोरे, आबा साळुंखे, विठ्ठल खुंटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक शेखर मोरे-पाटील म्हणाले, कोरोना महामारीचे संकट जगावर आलेले आहे. या मानवनिर्मित्त संकटातून वाचायचे असेल तर आपल्याला नियम पाळले पाहिजेत. त्याकरता यावर्षी आपल्याला यात्रा करता येणार नाही, असे त्यांनी मत व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनीही मार्गदर्शन केले. सुनील मोरे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले, गोडोलीकरांनी गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात महामारीमध्ये सातारा नगरपालिका व प्रशासनाला सहकार्य केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गोडोलीची यात्रा रद्द करुन प्रशासनाला सहकार्य करुयात, कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक गोडोलीकरांनी नियम पाळूयात. घरीच थांबूयात, असेही आवाहन त्यांनी केले. गोडोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा गोडोली गावातील यात्रा कमिटी व शहर पोलीस ठाणे यांच्यामध्ये झाल्ल्या चर्चेअंती रद्द करण्यात आली आहे. या शतकातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.