Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार : ठेकेदार न्यायालयात धावणार

टीम : धैर्य टाईम्स


फलटण : फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकदार यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. ठेक्याची मुदत कालावधी संपलेला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी बेकायदेशीर निविदा काढल्या असून याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे व न्यायालयात दाद मागणार असल्याचे सबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे.

याबाबत सबंधित ठेकेदार यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी सर्व्हे नंबर ६४८४ लक्ष्मीनगर बगीचा, लक्ष्मीनगर नाना नानी पार्क बगीचा, महतपुरा पेठ येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उद्यान व सर्व्हे नंबर १११ मधील बगीचा, सिटी सर्व्हे नंबर १९०७ शनीनगर बगीचा याबाबत फलटण नगर परिषद फलटण यांनी प्रशासकीय सभा घेऊन यापूर्वी निविदा मंजूर केल्या होत्या, त्यानुसार संबंधित ठेकेदार यांनी अनामत रक्कम भरुन मुख्याधिकारी यांनी करारनामा करुन दिला होता, त्यानुसार संबंधित ठेकेदार यांना कामाचे आदेश नगरपरिषद, फलटण यांच्याकडून देण्यात आले होते, त्यानुसार वरील बाग बगीचे देखभालीचे काम संबंधित ठेकेदार यांना मिळाले होते, संबंधित ठेकेदार उत्तम प्रकारे देखभाल करत होते, फलटण नगर परिषदे मधील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांची नेमणूक केली होती. 

त्यानंतर मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी यापूर्वी मंजूर झालेल्या निविदेचा कालावधी संपला नसतानाही संबंधित ठेकेदारांचा ठेका तसाच चालू न ठेवता दिनांक २०/०१/२०२५ रोजी वार्षिक निविदा दैनिक पुण्यनगरी व दैनिक गंधवार्ता मध्ये प्रसिद्ध केली असून यामध्ये वरील उद्यानासाठी एक वर्षाची निविदा प्रसिद्ध करण्याचा आदेश काढला आहे. मुळात सदर उद्यानाच्या देखभालीचा ठेका यापूर्वीच आम्हाला मिळाला असल्याने तसेच त्याचा कालावधी संपला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी चुकीच्या पद्धतीने हुकूमशाही करत जाहीर निविदा काढण्याचा घाट घातला असल्याचा आरोपी सबंधित ठेकेदार यांनी केला आहे.


सिटी सर्व्हे नंबर ६४८४ लक्ष्मीनगर बगीचा ठेका मुदत २०२६ अखेर , लक्ष्मीनगर नाना नानी पार्क बगीचा ठेका मुदत ३१/०३/२०२६, महतपुरा पेठ येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उद्यान व सर्व्हे नंबर १११ मधील बगीचा ठेका मुदत ०१/०२/२०२७, सिटी सर्व्हे नंबर १९०७ शनीनगर बगीचा ठेका मुदत ३१/०३/२०२६ असताना चुकीच्या पद्धतीने मनमानी करत आमचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने बेकायदेशीररीत्या हा नवीन ठेका काढण्याचा डाव मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी घातला आहे.

फलटण नगरपरिषद व ठेकेदार यांच्यामध्ये करारनामा झाला असून करारनामाच्या अटीस फलटण नगरपरिषदचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी कायदेशीर दुर्लक्ष केल्याने संबंधित चार ठेकेदार यांनी फलटण दिवाणी न्यायालयात मुख्याधिकारी निखिल मोरे व नगरपरिषद यांचे विरोधात कायदेशीर दाद मागण्याचे ठरवले असून याबाबत कायदेशीर नोटीस मुख्याधिकारी निखिल मोरे यांना बजावली असल्याची माहिती संबंधित ठेकेदार यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे ही दाद मागणार असल्याचे सबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे.वरील प्रकरणी बेकायदेशीररीत्या काढलेली वार्षिक निविदा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी तत्काळ मागे घ्यावी असे आवाहन संबंधित ठेकेदारांनी केले आहे व तसे न केल्यास नगर परिषदे समोर आम्हीं आमच्या कुटुंबासमवेत आमरण उपोषणास बसणार असल्याचे संबंधित ठेकेदारांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER