Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

‘कृष्णा नर्सिंग’च्या २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींची लिलावती व अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड

कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरीची संधी; जागतिक नर्सिंग दिनानिमित्त आयोजन
टीम : धैर्य टाईम्स
या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले २००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि अंबानी हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली आहे. - डॉ. वैशाली मोहिते

कराड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग महाविद्यालयातील सुमारे २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

जागतिक नर्सिंग दिनानिमित्त या दोन्ही नामांकित संस्थांनी नुकतेच कृष्णा नर्सिंग महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २३३ विद्यार्थी-विद्यार्थींनींची स्टाफ नर्स व नर्स एज्युकेटर या पदांसाठी निवड केली. गेल्या वर्षापासून जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीत कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्ससह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर विविध नामांकित हॉस्पिटल्सनी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफची भरती करण्यास प्रारंभ केला असून, तज्ज्ञ व कुशल स्टाफच्या नेमणुकीला प्राधान्य दिले जात आहे. याच उद्देशाने जागतिक नर्सिंग दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लिलावती हॉस्पिटल व संशोधन केंद्र आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्यावतीने कृष्णा नर्सिंग महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी लिलावती हॉस्पिटलच्या मनुष्यबळ व्यवस्थापक सौ. अपर्णा प्रभू, नर्सिंग सेवा विभागाच्या सहप्रमुख मृणाल वीरकर, कर्मचारी विकास विभागाच्या समन्वयक वैशाली वाघमारे, सुरक्षाप्रमुख विद्याधर पाटील प्रमुख उपस्थित होते. तसेच कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या नर्सिंग विभागाच्या सरव्यवस्थापक हवोवी फौजदार, स्नेहा करमळकर, कनिष्ठ मनुष्यबळ अधिकारी श्रुती तावडे उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराच्या नियमांचे योग्य पालन करत या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बी.एस्सी. नर्सिंग व जी.एन.एम. नर्सिंगच्या च्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या २०८, तर ५५ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींची अशी एकूण २६३ जणांची मुलाखत घेण्यात आली. यापैकी २३३ विद्यार्थी-विद्यार्थींनींची निवड करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना कृष्णा नर्सिंग अधिविभागाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते म्हणाल्या, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९८३ साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी दरवर्षीची प्रवेश क्षमता अवघी २० होती, जी आज २३० झाली आहे. आप्पासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. सद्यस्थितीत कृष्णा नर्सिंग महाविद्यालयात दरवर्षी जी.एन.एम. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ६०, बेसिक बी.एससी. नर्सिंगसाठी १००, पोस्ट बेसिक बी.एससी. नर्सिंगसाठी ४०, नर्स प्रॅक्टिशनर इन क्रिटीकल केअरसाठी २०, एम.एससी. नर्सिंग पाच स्पेशॅलिटी अभ्यासक्रमांसाठी २०, तसेच पी.एचडी. अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात.

याप्रसंगी प्रा. मनिषा घोलप, लक्ष्मी नायर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर तेजस भोसले, स्वाती इंगळे, निशी पै यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER