फलटण प्रतिनिधी:- मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एका मुलाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण मधील रविवार पेठ ते एसटी स्टँड तालुका फलटण येथे फिर्यादी मुलगी तिच्या आईला स्टॅन्ड वरून आणणे करिता मोटरसायकल वरून गेली असताना सत्यम विलास जाधव (रा. रविवार पेठ फलटण ता. फलटण) याने फिर्यादी मुलीचा बुलेट मोटरसायकल वरून पाठीमागून येऊन पाठलाग केला तसेच मुलगी पुन्हा आईला स्टॅन्ड वरून घेऊन घरी जात असताना देखील तसेच यापूर्वी देखील वेळोवेळी सत्यम याने पाठलाग केला आहे अशी फिर्याद मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सत्यम विलास जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार येळे करत आहेत.