काहीजण जेवणानंतर ताक पिणे पसंत करतात. ही चांगली सवय आहे. पण ताक ज्यापासून तयार होते ते दही सगळ्यांनाच सोसते असे नाही. दह्यापेक्षा कधीही ताक चांगले. असे का बरे म्हंटल जात असेल? दह्यामध्ये असे बरेच घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होतो. नुसत्या दह्यापेक्षा कधीही ताक पिणे चांगले असते.
सातारा : काहीजण जेवणानंतर ताक पिणे पसंत करतात. ही चांगली सवय आहे. पण ताक ज्यापासून तयार होते ते दही सगळ्यांनाच सोसते असे नाही. दह्यापेक्षा कधीही ताक चांगले. असे का बरे म्हंटल जात असेल? दह्यामध्ये असे बरेच घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होतो. नुसत्या दह्यापेक्षा कधीही ताक पिणे चांगले असते.
दह्यामध्ये पाणी मिसळून ते घुसळले जाते त्यावेळी काही उपयुक्त प्रोटीन्स रीलिज होतात. अनेकांना दही बाधते. विशेषतः फ्रीजमध्ये ठेवलेले दही रात्री खाऊ नये. टॉन्सिल्स किंवा सायनस असणाऱ्यांनी तर मुळीच नाही. ताक हे दह्याच्या तुलनेत चांगल कारण ताकाने पचनासाठी मदत होते. ताक थंड असते. त्यामुळे ॲसिडिटीपासून सुटका होते. दही आणि ताकात दोघांमध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. पण आंबट दही उष्णता वाढवू शकते.
दही आणि ताक कधी घेणे चांगले?
शक्यतो ताप, सर्दी ,खोकला असताना दही ताक घेणं टाळावे. पण असे काही आजार आहेत की, ज्यामध्ये दही किंवा ताक पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. बऱ्याचदा डॉक्टर तोंडाची चव नसल्यास दही खाण्याचा सल्ला देतात. ताकामुळे पोटातील जळजळ आणि छातीत होणारी जळजळ कमी होते. ते डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. ताकाने वजन कमी करण्यासाठीसुद्धा मदत होऊ शकते, फक्त ते मलईविरहित असावे.