सातारा, दि. ६ शासनाच्या विविध योजनांची व जन कल्याणकारी निर्णयांची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने संवाद वारी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांची आज सातारा जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. लोणंद येथील शासकीय विश्रामगृह परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसीलदार अजीत पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदिंसह कलापथक व पथनाट्य कलाकार, वारकरी व नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री डूडी यांनी फित कापून व श्रीफळ वाढवून उद्घाटन केले व संवाद वारी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
या संवाद वारी उपक्रमामध्ये योजनांची माहिती देणारे प्रदर्शन, चित्ररथ, पथनाट्य यांचा समावेश आहे. या माध्यमातून शासनाच्या योजनांची व जन कल्याणकारी निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे.