फलटण : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काही दिवसातच फलटण येथे मुक्कामी येणार आहे त्यासाठी आवश्यक कामाकरिता आज मंगळवार दिनांक 17 जून रोजी फलटण शहरासह उपनगरातील वीज पुरवठा काही वेळ खंडीत होणार आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरण ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील वीज पुरवठा बंद पुढील प्रमाणे राहणार आहे 22KV फलटण शहर सकाळी 11.00 ते दुपारी 4.00, 22KV YC फिडर सकाळी 11 ते सायंकाळी 6.00 , 22KV Municipal फिडर सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत वरील फिडर वरील लाईट सप्लाय बंद राहील. काम लवकर झाले तर दिलेल्या वेळापूर्वी देखील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. कृपया याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे महावितरण च्या वतीने करण्यात आले आहे.