फलटण | धैर्य टाईम्स |
यूट्यूब वरील मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती या मालिकेतील विनोदी अभिनेते रामभाऊ जगताप यांनी आज फलटण येथील राम पेट्रोलियम येथे सदिच्छा भेट दिली. त्यावेळी राम पेट्रोलियमच्या वतीने राम नाईक निंबाळकर, विक्रम झांझुर्णे,रणधीर भोईटे यांनी अभिनेते रामभाऊ जगताप यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. त्यावेळी आबा माने, आर्किटेक्ट अँड बिल्डर वीरेंद्र झांझुर्णे पत्रकार सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.