फलटण प्रतिनिधी :
फडतरवाडी ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषीकन्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सर्व केंद्रातील प्राथमिक शाळा सुरू झाल्या व १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आज कृषी महाविद्यालय फलटण मधील कृषीकन्यांनी त्यामध्ये सहभाग दाखवला. विध्यार्थ्यांना गुलाब फुल व खाऊ देण्यात आला. शाळेतील वर्गांची सजावट करण्यात आली. मुलांना शिक्षण हे ओझं वाटू नये,हसत खेळत त्यांनी शिकावे, त्यांना शाळेची ओढ लागावी, अशी कार्यक्रमाची भूमिका होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ.पौर्णिमा काटे, मा. उपसरपंच अनुराज नलवडे, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
तसेच कृषीकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे,वैष्णवी चांदगुडे , निधी कोडपे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतिषा पंडित, प्रा. सुरेश साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.