Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन साजरा सातारा जिल्हा समन्वय समिती सदस्यपदी : धैर्यशील उर्फ दत्ता अनपट वैद्य निलेश लोंढे यांची निमा आयुर्वेद फोरमच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई शिंपी समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी श्रीमती सुलभा मोहटकर तर सचिवपदी सौ. रेखा हेंद्रे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया थाटामाटात साजरी होणार : विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा ता. खंडाळा यांच्या वतीने श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस : बिरदेव डोणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल तालुक्याचा विकासाचा बॅकलॉक भरून काढणार - मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर शहराचा पारा ४२ पार ? प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ ; प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही सूचना नाहीत फलटण तालुका भाजपा मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर : अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास उर्फ बापूराव शिंदे यांना संधी डॉ. आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाला विलंब का ? आंबेडकरी अनुयायांचा प्रश्न डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी वाचनालयास पुस्तके भेट पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी - उपमुख्यमंत्री अजित पवार समोसे, जिलेबी, कचोरीला इंग्रजीत काय म्हणतात? खूप कमी लोकांना ठाऊक आहे इंग्रजी शब्द... चला तर मग गॅलेक्सीच्या चेअरमनपदी सचिन यादव तर व्हॉइस चेअरमनपदी योगेश यादव ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांचा उद्या साताऱ्यात गौरव समारंभ

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

सार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी ..!
टीम : धैर्य टाईम्स

सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.


जिल्ह्यातील सार्वजनिक रस्ते,मंदिरे,रुग्णालये,एसटी बसस्थानक अशा ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा पसारा आणि अस्वच्छता असल्याचे दस्तुरखुद्द राज्याच्या पर्यटनमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आल्यामुळे मंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पोलीस,महसूल आणि ग्राम विकास विभागाची बैठक घेतली.

 या बैठकीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता 

ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात होत आहेत त्या संस्थांनी तातडीने दखल घेण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले. गट विकास अधिकारी पाटण व मुख्याधिकारी पाटण नगरपंचायत यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात एका स्वतंत्र पथकाची नियुक्ती करणेबाबत सूचित केले. तसेच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रस्त्याच्या कडेला रात्री अपरात्री कचरा टाकणाऱ्या व्यक्ती ना तत्काळ नोटीसा काढाव्यात. याबाबत आवश्यक ती जनजागृती देखील करावी. तसेच कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी. यानंतरही कुणी ऐकत नसेल तर प्रसंगी अशी दुकाने किंवा हॉटेल सील करण्याचा देखील पर्याय वापरण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. प्रांत अधिकारी पाटण व उपविभागीय पोलिस अधिकारी पाटण यांनी या कार्यवाहीचे संपूर्ण नियंत्रण करावे.तसेच या मुद्द्यासंदर्भात प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांची तत्काळ बैठक घेण्याचे आदेश संबंधित गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. सुरवातीला पाटण तालुक्यात राबविण्यात येनारी ही मोहीम नंतर च्या काळात संपूर्ण सातारा जिल्ह्यात देखील राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

 सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करून घ्याव्यात त्यानंतर ही अस्वच्छता दिसून आल्यास अथवा संबंधित व्यक्तींनी रात्री अपरात्री कचरा टाकल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पर्यटन मंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.

सदर बैठकीस पाटण मतदारसंघातील महसूल ,पोलिस व ग्रामविकास विभागाचे विविध अधिकारी हजर होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER