फलटण प्रतिनिधी : दुधेबावी ( ता. फलटण ) ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व राजे गटाचे कट्टर समर्थक भाऊसाहेब मोरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला. त्यामुळे राजे गटाला फलटण तालुक्यात पुन्हा एकदा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तर दुधेबावीच्या विकासासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दुधेबावीतील कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशावेळी व्यक्त केला. त्यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कोळकी मंडल अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, युवा नेते नानासाहेब आडके, माजी सरपंच त्रिंबक सोनवलकर, उत्तमराव सोनवलकर , संतोष सोनवलकर भाऊसाहेब सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाऊसाहेब मोरे यांच्यासह सचिन मोरे, तानाजी मोरे, संतोष मोरे,मनोज मोरे सर, सनी मोरे, समीर मोरे, लक्ष्मण मोरे, योगेश मोरे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.