Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स | 21 जून


कोळकी या फलटण शहरालगतच्या गावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून अंदाजे ९० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस तातडीचे मंजुरी आदेश दिले असल्याची माहिती माजी खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिली.


कोळकी गावासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर होवून ग्रामस्थांना दररोज स्वच्छ, निर्जंतुक, पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचे समजताच कोळकी ग्रामस्थांनी फटाके वाजवून व जिलेबी वाटप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिनपा पाटील यांचा जयजयकार करत जल्लोष केला.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खा. रणजितसिह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांचे ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले. कोळकी है फलटण शहरालगतचे गाव असून या गावाची लोकसंख्या व विस्तार झपाट्याने वाढत आहे. कोळकी गावासाठी सर्व नागरी सोयी सुविधा पुरविणे व देखभाल दुरुस्ती कामे ग्रामपंचायतमार्फत केली जातात. सद्यस्थितीत कोळकी ग्रामपंचायतीने २०१५ मध्ये सुधारित नळपाणी पुरवठा योजना तयार करून ग्रामस्थांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.


सदर योजना नीरा उजवा कालवा जल उद्भव गृहीत धरून राबविली आहे, या योजनेत गावासाठी २ महिने पुरेल इतक्या क्षमतेचा साठवण तलाव आहे. ही योजना १५ हजार लोकसंख्या अपेक्षित घरुन २०१५ साली अस्तित्वात आली परंतु सध्याची लोकसंख्या ३० हजार असल्याने आठवड्यातून केवळ २ वेळा पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.


गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी ही बाब माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आ. सचिन पाटील, अभिजित नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, बाळासाहेब काशिद, सचिन रणवरे, संजय देशमुख, उदयसिंह निंबाळकर, संदीप नेवसे, सतीश शेडगे, विकास नाळे, रणजित जाधव, गोरख जाधव, यशवंत जाधव, सचिन हजारे, किरण जाधव, राजू खिलारे, निरंजन निंबाळकर,विष्णू फडतरे, सागर चव्हाण, रोहन शिंदे, गणेश शिंदे, माउली शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र

जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होवून २०५४ साली कोळकी गावची लोकसंख्या अंदाजे ७३,००० ग्राह्य धरून गावासाठी नवीन योजना तयार करण्यात आली. यामध्ये जादा साठवण क्षमता असलेला तलाव बांधणे गरजेचे आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व उपायांचा वापर करून नवीन जलशुद्धीकरण केंद्र, दाबनलिका, उंच टाकी, वितरण व्यवस्था, सोलर पॅनेल, प्रत्येकाचे घरी नळ, निर्जंतुक, स्वच्छ पाणी देणे गरजेचे असल्याचे ठरवून आराखडा तयार करण्यात आला. सदर प्राथमिक आराखडा व अंदाजपत्रक सादर करून माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिल्यानंतर त्यांनी वरीलप्रमाणे कोळकीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. कोळकी गावातील राजे गटाचे पदाधिकारी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी कोळकी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी व आ. सचिन पाटील यांनी पाळला याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER