फलटण प्रतिनिधी : स्मार्ट शाळा प्रकल्पांतर्गत राजाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात १ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले असून इमारतीचे भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व आ. सचिन पाटील यांच्या उपस्थित सोमवार, दि. १६ रोजी संपन्न झाले तर शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांचे स्वागत करून करण्यात आले.
समारंभास विशेष अतिथी म्हणून निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, फलटणचे उपअभियंता राजकुमार मठपती उपस्थित होते. कार्यक्रमास राजाळे व पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच सौ. कविता महिपाल आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नीलेश हणमंतराव भोईटे यांनी केले आहे.