फलटण प्रतिनिधी - २३ मे २०२५
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तरी फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे अशी सूचना फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केली आहे. त्यांचबरोबर कुठेही आपत्ती सदृश्य परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रशासनास अवगत करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.