फलटण प्रतिनिधी - फलटण तालुक्याचे युवा नेते भाजपा किसान मोर्चा प्रदेशउपाध्यक्ष व फलटणचे ज्येष्ठ स्व बी.के.भाऊ निंबाळकर यांचे चिरंजीव सुशांतभैय्या निंबाळकर यांचा वाढदिवस दिनांक ५ जून रोजी उत्साहात साजरा होत असतो मात्र यावर्षी ॲापरेशन सिंदूर व फलटण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग यांचे झालेले नुकसान पाहता सुशांतभैय्या वाढदिवस साजरा करणार नाहीत अशी माहिती सातारा जिल्हा आदर्श सरपंच व जि.प.समन्वयक सनियंत्रण समितीच्या सदस्य सौ अस्मिताताई सुशांत निंबाळकर यांनी दिली.
सुशांत निंबाळकर यांच्या कार्याचा आढावा
सुशांत बापूसाहेब निंबाळकर हे 2014 पासून भाजपचे फलटण तालुका मंडल अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 6 वर्ष सामाजिक नावीन्यपूर्ण काम केले आहे ,तसेच जिल्हा युवा मोर्चा प्रभारी म्हणून देखील काम केले आहे, सुशांत निंबाळकर पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या
पदावर काम करीत आहेत, तसेच गावचे आदर्श सरपंच म्हणुन त्यांनी उत्तम काम केले आहे. फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक व विंचुर्णी विकास सेवा सोसायटी व सहकरी संस्थेत उत्तम काम केले आहे. भाजपा पक्षाचे सातारा विस्तारक म्हणुन काम केले आहे,माढा व सातारा व पुणे लोकसभा व पंढरपूर पोटनिवडणुकीत व कराड सातारा व माण कोरेगाव व फलटण विधानसभा निवडणुकीत युवा मोर्चा टिम बरोबर महायुतीचे प्रभावी काम केले आहे.
पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडल्या आहेत. सभासद नोंदणी अभियान योग्य रितीने राबवले स्वता 1500 सभासद पुर्ण केलेले आहेत व मतदार संघात 50,000 हजार सदस्य पूर्ण करण्यास सुरुवात आहे.
सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. ते असंख्य युवा वर्गाचे चाहते आहेत. कायम मदतीसाठी तत्पर, कर्तव्यदक्ष,कोणताही भेदभाव न करता काम करत राहणे हे आपले कर्तव्य आहे असे ते म्हणतात.