महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, शेतकऱ्यांचे कैवारी, थोर समाजसेवक एवढीच महात्मा फुले यांची ओळख नाही. त्यांचं कार्यकर्तृत्व त्यापेक्षाही मोठं आहे समानता - सत्यासाठी देह झिजणारे बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2023 फलटण यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक मधुकर काकडे, आर. पी. आय. चे जेष्ठ नेते विजयराव येवले, बापूसाहेब जगताप, मुन्ना शेख, राजू मारुडा, संजय निकाळजे, सतीश अहिवळे, मारुती मोहिते, लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, जय रणदिवे, उमेश कांबळे, अमित काकडे, शामराव काकडे, महादेव अहिवळे, बंडू अहिवळे, विमलताई काकडे, मीनाताई काकडे, सुलनताई काकडे, शकुंतला बनसोडे, राखी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.