मुळीकवाडी येथील बाचकी नावाचे शेतात सुरेश शिवराम पवार याच्या शेतात लोणंद पोलिसांनी धाड टाकून अफूची २७३७ झाडे बोंडासह हस्तगत करून २ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन संबंधित अफूची बेकायदेशीर शेती करणार्या शेतकऱ्यांला ताब्यात घेण्यात आले आहे.
लोणंद पोलिस ठाण्यातून व घटनास्थळावरुन मिळालेली मिळालेली माहिती अशी की, मुळीकवाडी ता फलटण गावच्या हद्दीत मुळीकवाडी- बडेखान रोड लगत बाचकी नावाचे शेतात सुरेश शिवराम पवार या शेतकऱ्याच्या शेतात काद्याचे आंतर पिकात अफूची झाडे असल्याची माहिती लोणंद पोलिसांना यांना मिळाली होती.
दिनांक 4 रोजी सायंकाळी सर्व तयारी निशी सापळा रचून सुरेश शिवराम पवार यांच्या शेतात धाड टाकली असता कांद्याच्या आंतर पिकामध्ये अफूची बोंडे आलेली झाडे आढळून आली व त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकामध्ये लपवून ठेवली असल्याचे आढळून आल्यानंतर सदर शेतातील अफूची बोंडे असलेले २७३७ झाडे उपटून ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. या कारवाईत २ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा किंमतीची अफूच्या बोंडे सापडली. सर्व मुद्देमालाचे साक्षीदार समक्ष पंचनामा करुन मुद्देमाल सीलबंद करणेत आला. संबंधित शेतकऱ्यास लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबतची फिर्याद पो कॉ वैभव सावंत यांनी दिली. सदर प्रकरणी सुरेश पवार यांच्या विरोधात लोणंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक एस.एन.पवार करीत आहेत.