सालाबाद प्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा निमित्त मोफत दवाखान्याचे आयोजन उमाजी नाईक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने उमाजी नाईक चौक फलटण येथे करण्यात आले होते.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या मुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. मात्र या वर्षी पुन्हा पालखी सोहळा सुरु झाल्यामुळे या ठिकाणी मोफत दवाखाना सुरु करून शेकडो वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले. या ठिकाणी सर्व आजारावर औषध उपचार करण्यात आले. वारकऱ्यांसाठी सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत औषध उपचार करण्यात आले. या वेळी बिल्डर असोसिएशनचे मा. अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, डॉ. सुभाष गुळवे, शहाजी मदने, मा. नगरसेवक अनिल शिरतोडे, लक्ष्मण जाधव, सुनील नेवसे उपस्थित होते. फलटण तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने व उमाजी नाईक तालीम मंडळ फलटण यांच्या सहकार्याने हे शिबिर उत्तम प्रकारे यांच्या सहकार्याने पार पडले.