सातारा दि. 11 :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा ४६ वा वर्धापन दिन जिल्हा कार्यालय सातारा येथे दिनांक १० जुलै २०२४ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सहायक आयुक्त समाज कल्याण सातारा नितीन उबाळे यांची होती. तसेच महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. पवार व लेखाधिकारी हेमंत खताळ, वसंतराव नाईक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे व इतर सर्व महामंडळाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
महामंडळाचे लेखाधिकारी हेमंत खताळ यांनी महामंडळाच्या विविध योजनांविषयी माहिती देऊन महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश व साध्य केलेल्या उद्दिष्टाचा आढावा घेतला. समाज कल्याण आयुक्त नितीन उबाळे यांनी महामंडळाच्या वर्धापन दिनी सर्वांना शुभेच्छा देवून महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना मिळण्याकरीता मेळाव्याचे आयोजन, जनजागृती करावी असे सांगितले, महामंडळाच्या विविध योजनेअंतर्गत लाभधारकांना निधी वितरणाचे धनादेश देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नम्रता आमंदे यानी केले, तसेच आभार सागर भोसले यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.