येथील बुधवार पेठेतील विजय विनोद कांबळे (वय 26) या युवकाच्या डोक्यात कोयता मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील बुधवार पेठेतील विजय विनोद कांबळे (वय 26) या युवकाच्या डोक्यात कोयता मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णा शिंदे (रा. कोंडवे, ता. सातारा), गौरव भिसे ऊर्फ टेट्या, शुभम साठे (दोघेही, रा. मल्हारपेठ, सातारा) अशी खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय कांबळे हा दि. 11 रोजी दुपारी एकच्या सुमारास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरातील एका टपरीवर चहा पित होता. यावेळी हे तिघे तेथे आले. कृष्णा शिंदे याने तू माझ्या पप्पांना का बोललास,’ असे विचारले, तर गौरव भिसे याने त्याच्या हातातील कोयता व दांडके व चाकूने विजय याला मारहाण करून त्याच्यावर वार केले. सध्या त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.
विजयच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कृष्णा शिंदे, गौरव भिसे, शुभम साठे या तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.