फलटण - प्रतिनिधी
मंगळवार पेठेतील किरण राजु काकडे या तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाविरूध्द या भागातील विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकां-यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढुन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देवुन पिडीत तरूणाच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत करण्याची मागणी केली आहे.
फलटण शहराच्या विविध भागात पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी डासांचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यू रोगाची निर्मिती झाली आहे मृत्य तरूण काकडे यांच्या घरा पुढील प्रांगणात मोठया प्रमाणात डास झाले असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
यापुर्वीही डेंग्यूने एकाचा बळी घेतला होता काकडे यांच्या रूपाने दुसरा बळी घेतला आहे पालिकेने उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी ज्या भागात डास निर्मिती मोठया प्रमाणात होत आहे त्या भागात पालिका उपाययोजना करताना दिसत नसल्याचे नागरीकांचे मत आहे.
काकडे यास डेंग्यू झाल्याने त्यास येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास पुणे येथे उपचारासाठी नेले होते दुर्दैवाने दि .2४ रोजी पुणे येथील उपचारादरम्यान काकडे यांचा मृत्यू झाला
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार पेठेतील विविध राजकीय पक्ष व् संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाविरूध्द फलटण नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. मोर्चेकऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देन्यात आले
पिडीत काकडे यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने दवाखान्यातील उपचार खर्च लोकवर्गणी जमा करून केला होता पालिका प्रशासनाने काकडे कुटुंबाला रूपये पाच लाख आर्थिक मदत व त्यांच्या आईला पालिकेत नोकरी दयावी अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे
मोर्चात कामगार संघर्ष संघटनेचे सनी काकडे, मा.नगरसेवक सनी अहिवळे, सचिन अहिवळे, हरिष काकडे, श्याम अहिवळे,महादेव गायकवाड, वंचित बहुजन आघाडीच्या फलटण शहराध्यक्ष सौ. सपना भोसले,यांचे सह विविध संघटनांचे पदाधिकारी , माहिला सहभागी होत्या.