सातारा जिल्ह्यातील प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी संचालकांच्या २१ जागांसाठी मतदान होणार आहे. दि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी संचालकांच्या २१ जागांसाठी मतदान होणार आहे. दि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा बॅंकेत प्राबल्य असले तरी भाजपचे खा श्री छ उदयनराजे भोसले खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ जयकुमार गोरे, आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निर्णायक मते असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जुळवून घ्यावेच लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काही नवीन चेहऱ्याना संधी उपलब्ध झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय सोसायटी मतदारसंघात अनेकजण उत्सुक आहेत. त्यामुळे सोसायटी मतदार संघात चुरस असून दि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दोन पॅनेल मधून निवडणूक झाली तर मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी ४ ऑक्टोबरमध्ये जाहीर झाली होती. परंतु कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात उच्च न्यायालय याचिका दखल झाल्यामुळे सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम लांबला होता. अखेर शनिवारी तो जाहीर झाला. सोमवारपासून हा निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे. दि. १८ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज दाखल करणे. २६ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी, आणि २७ रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे.
दि २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.