विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या सातारा मंडल सर्कलच्या अध्यक्षपदी फलटण येथील शरद मोहन मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सण 2023-24 साठी नवीन मंडल कार्यकारीणीच्या निवडीमध्ये सर्कल अध्यक्षपदी शरद मोहन मोरे यांची बिनविरोध निवडीबद्दल मकरंद आवळेकर कार्यकारी अभियंता, गणेश जमाले अतिरिक्त का.अभियंता, फलटण ग्रामीण उपविभागीय उप कार्यकारी अभियंता भारत खिलारे,फलटण शहर उपविभाग अतिरिक्त का. अभियंता सचिन कोरडे आदींनी अभिनंदन केले आहे.
श्रीराम वीज कामगार सहकारी पतसंस्था, फलटणचे संचालक स्नेहित टोपे व वि.क्षे.तां.का. यूनियनचे विभागीय संघटक तानाजी पवार तसेच राजेश भालेराव बाह्यस्त्रोत कर्मचारी अक्षय गाडे , सनी ढवळे , सहकारी मित्र वैभव फडतरे, अनिकेत बोबडे आदींनी शरद मोरे यांचा यथोचित सत्कार केला.