फलटण प्रतिनिधी :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बिबी ता. फलटण येथे कँडल रॅली काढत अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करण्यासाठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी मेणबत्ती प्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे व उपाध्यक्ष दादा गायकवाड,अशोक काकडे, गणेश काकडे, उमेश काकडे, अमोल भोसले, महिपत काकडे, सुधाकर काकडे,ग्रामपंचायत सदस्या सौ. संगीता काकडे व इतर मान्यवर आणि मंडळाचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.