फलटण प्रतिनिधी:- मालकाच्या परस्पर टेम्पो चोरी करताना आढळून आल्या प्रकरणी एकाच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास मोजे वडजल ता फलटण गावचे हद्दीत लोणंद ते फलटण जाणारे रोडवर शहरून राजू पठाण (सध्या राहणार वार्ड 5 निरा ता पुरंदर जिल्हा पुणे मुळ रा. हडपसर पुणे) याने राजकुमार रघुनाथ लोखंडे (राहणार कोंढवा खुर्द पुणे) यांच्या संमतीशिवाय लबाडीने त्याच्या मालकीचा पिवळ्या रंगाचा टाटा कंपनीचा 407 मॉडल असलेला चारचाकी क्रमांक MH12MV 2723 हे वाहन चोरी करून घेऊन जात असताना आढळून आला असता शारुण राजू पठाण याच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. हवा चतुरे करत आहेत.