फलटण येथील व्यापारी संतोष रतनलाल दोशी याच्या गोडाऊन मधून तब्बल १,११,६७३ रुपये किमतीचा गुटखा पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलिस रिमांड देण्यात आले आहे.
फलटण : (प्रतिनिधी )
वाजेगाव ता. फलटण येथील एका दुकान मालकासह फलटण येथील एका होलसेल किराणा दुकान मालकावर फलटण तालुका ग्रामीण पोलिसांनी गुटखाबंदी विरोधी धडक कारवाई करत १,३३,४७१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती फलटण ग्रामीम पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.
या सबंधित सविस्तर वृत्त असे, वाजेगाव (ता. फलटण )येथील सुरज किराणा स्टोअर्स येथे बेकायदेशीर गुटखा विक्री प्रकरणी दुकानाचा मालक केशव विठोबा गायकवाड वय ६० वर्ष यास अटक करण्यात आली असून या ठिकाणी २१,९७८ रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीस पोलिस कस्टडी येथे विचारपूस केल्या नंतर सदरचा गुटखा आपण फलटण येथील एका व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर फलटण येथील व्यापारी संतोष रतनलाल दोशी याच्या गोडाऊन मधून तब्बल १,११,६७३ रुपये किमतीचा गुटखा पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. असा दोन्ही अवैद्य गुटका विक्रेत्यांकडून तब्बल १,३३४७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दोन्ही आरोपींना पोलिस रिमांड देण्यात आले आहे.
सदरची कारवाई सातारा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अजित बोऱ्हाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, फलटण ग्रामिण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे याच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे,उर्मिला पेदाम, दादासो यादव, अभिजीत काशीद, राजेंद्र गायकवाड, अमोल जगदाळे व गणेश अवघडे यांनी केली.