फलटण प्रतिनिधी :
फलटण नगरपरिषद हद्दीमध्ये श्री. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे दिनांक 21 रोजी आगमन होत असून नगरपरिषदे मार्फत दरवर्षी श्रीसंत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्तमरित्या पार पाडणे करीता फलटण नगरपरिषद सज्ज असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद संजय गायकवाड यांनी दिली.
फलटण नगर परिषद हद्द सुमारे 7.15 स्क्वेअर किलो मीटर आहे. या मध्ये मुख्य पालखी तळा व्यतिरिक्त विविध ठिकाणी पालखी सोहळयामध्ये सहभागी असणा-या दिंडया मुक्कामी राहतात. या सर्व ठिकाणी पालखी पुर्व व पालखी पश्चात स्वच्छतेचे प्रमुख नियोजन नगर परिषदे मार्फत करण्यात आली आहे. शहर स्वच्छता नियोजन शहर स्वच्छते करीता 2 स्वच्छता निरिक्षक, 6 मुकादम, 130 सफाई कर्मचारी, 150 शासनाकडील जादा कर्मचारी, 25 ठेका सफाई कर्मचारी, 16 घंटागाडया, 4 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 टाटा 407, 1 टाटा 607,1 जेसी मशिन याव्दारे संपूर्ण शहर व पालखी तळाची स्वच्छता केली जाते. गत वर्षी 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 1 टाटा 607,1 जेसी मशिन 150 शासनाकडील जादा कर्मचारी, 25 ठेका सफाई कर्मचारी जादा लावणेत येऊन संपूर्ण शहरची पालखी पूर्व पालखी पश्चात स्वच्छतेचे नियोजन केलेले आहे. तसेच रोगराई पसरु नये, संसंर्ग टाळणे करीता जंतुनाशक व 12 फॉगींग मशिन व्दारे धुर फवारणी केली जाते. यामुळे साथरोगाचा प्रार्दुभाव होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता नगर परिषद घेत आहेत. संकलीत झालेल्या कच-यावर नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्प केंद्र येथे शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करणेत येणार आहे.
निर्मलवारील शौचालय नियोजन
गतवर्षी निर्मलवारी करीता 1000 शौचालये उपलब्ध करुन देणेत आली होती. यावर्षी 1500 शौचालये उपलब्ध करुन देणेत आलेली आहेत. ही शौचालये मुख्य पालखी तळ येथे प्रत्येक ठिकाणी 100 व एका ठिकाणी 250 अशी एकूण 1300 शौचालये उपलब्ध करुन देणत येणार आहेत. उर्वरीत 200 शौचालये शहर हद्दीमध्ये इतरत्र दिंडया उतरणेचे ठिकाणी पुरविणेत येणार आहेत. जाधववाडी मध्ये शौचालयांकरीता लागणा-या पाण्याचे नियोजन केलेले आहे. याठिकाणी निर्मलवारी टँकर फिडींग पाँइटची व्यवस्था केलेली आहे. एका निर्मलवारी करीची क्षमता 20 हजार लिटर इतकी आहे. पुरेसे व मुबलक पाणी 24 X 7 वेळेत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. शौचालयांमध्ये निर्माण होणारा मैला निर्जन स्थळी खड्डा करुन त्यावर जंतुनाशक व डिस्फीक्टो फवारणी करुन खड्डा पुर्ववत बुजवणेत येणार आहे. यामुळे कोणताही आजार किंवा साथरोग प्रसरणार नाही. तसेच शहरातील शौचालये / मुतारी साफ करणे करीता नगरपरिषदेने स्वतंत्र वाहनाची सोय केली आहे. यावर प्रेशरगन बसविणेत येऊन शौचालयांची/ मुतारी सफाई करणेत येणार आहे.
पालखी तळावरील प्रकाश व्यवस्था
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पालखी तळावरील प्रकाश व्यवस्थेत मोठया प्रमाणात वाढ नगर परिषदे मार्फत करणेत आलेली आहे. गतवर्षी 3 टॉवर्स, 2 जनरेटर उभारुन पालखी तळावर प्रकाशाची व्यवस्था करणेत आलेली होती. यावर्षी नगरपरिषदे मार्फत 6 मोठे जनसेट (30 के. व्ही. क्षमता) व 1 जनसेट (7.5 के. व्ही. क्षमता राखीव तातडीची बाब म्हणुन) असलेले जनरेटर पालखी तळावर प्रकाश व्यवस्थेकरीता ठेवणेत येणार आहेत. या व्यतीरिक्त निर्मलवारीतील शौचालयांकरीता 15 पोर्टेबल जनरेटर (3.50 के. व्ही. क्षमतेचे) आहेत. 6 मोठ्या टॉवर्सवर फ्लड लाईट बसवुन मागील वर्षी पेक्षा मोठया टॉवर्सवर फ्लड लाईट दुप्पट वाढ करणेत आलेली आहे. राखील जनरेटरची सोय केली आहे.
फलटण शहरातील पालखी मार्ग
फलटण शहरामधुन आगमन व निगमन असा एकूण 8 कि.मी. लांबीचा मार्ग आहे. पैकी 4.00 कि.मी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. हा रस्ता सुस्थितीत आहे. फलटण नगर परिषदेच्या मालकीच्या 4.00 कि.मी. पालखी मार्ग सुस्थितीत आहेत. रस्त्याच्या कडेचा राडारोडा, चेंबर दुरुस्ती, गटारे दुरुस्ती करुन पालखी मार्गावरील बांधकाम साहित्य पूर्णपणे उचलणेत आलेले आहे.
पाणी पुरवठा
फलटण शहराला पेठ सोमवार येथील सुधारीत जलकेंद्र येथून पाणी पुरवठा करणेत येतो. साठवण तलावाची क्षमता 550 एमएलडी इतकी आहे. गतवर्षी पेक्षा जादा फिडींग पॉईंट उभारणी करणेत आलेली आहे. सुधारीत जल केंद्र येथे 8 फिडींग पॉईंट, खजिना हौद 1 फिडींग पॉईंट, भडकमकर नगर । फिडींग पॉईंट, जाधववाडी । फिडींग पॉईंट उभारणेत येणार आहेत. प्रती दिनी सुमारे 1300 टँकर नगरपरिषदे मार्फत भरले जातात. पालखी तळावर 4 टँकर उपलब्ध करुन देणेत येणार आहेत. पालखी तळ, रिंगरोड येथे तात्पुरते नळ कनक्शन उभारणी केली जाते येथे 24X7 पाणी पुरवठा केला जातो.
महिलांकरीता विशेष सोई सुविधा
पालखी मुक्काम ठिकाणी महिलांकरीता दोन स्वतंत्र स्नानगृह तयार करणेत येतात. एका वेळेस 25 महिलां स्नानगृहांचा वापर करु शकतात. पालखी सोहळयामध्ये सहभागी होणा-या स्त्रीयांकरीता मोफत सॅनेटरी नॅपकीन वाटप करता येते. शहरामध्ये 15 ठिकाणी सॅनेटरी नॅपकीन वाटप करता येतात. शहरामध्ये 5 ठिकाणी वेडिंग मशीन लावणेत येतात. पालखी तळावर महिलांकरीता हिरकणी कक्षाची स्थापना करुन त्यामध्ये एक महिला अधिकारी व दोन महिला कर्मचारी यांची नेमणुक करणेत आली आहे. शहरामधील पालखी मुक्काम ठिकाणी व इतरत्र दिंडया मुक्काम ठिकाणी महिलांकरीता 500 राखीव शौचालये ठेवणेत येतात. फलटण नगर परिषदेने मार्फत महिला वारक-यांना निवासा करीता पालखी मुक्कामा नजीकची समाजिक सभागृहे, बहुउद्देशीय हॉल उपलब्ध करुन देणेत आलेली आहेत अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद संजय गायकवाड यांनी दिली.