Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

मराठी भाषा संवर्धनाचं काम बापू काळभोर यांच्यासारख्या लेखाकांमुळेच : मंगेश चिवटे

"बापु'ज डायरी" पुस्तकाचे प्रकाशन 
टीम : धैर्य टाईम्स

पुणे :

संस्कृती कशी टिकू शकते, असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो. मराठी भाषा लिहिली, बोलली तरच टिकू शकते. मराठी भाषा संवर्धनाचं काम खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये बापू काळभोर यांच्या सारखे लेखक करत आहेत. म्हणूनच त्यांचा आदर्श येणाऱ्या काळामध्ये समाजातील युवकांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्याधिकारी व वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.  

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापु) काळभोर यांनी लिहिलेल्या "बापु'ज डायरी- आठवणीतल्या चार गोष्टी'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा थेऊर फाटा येथील हॉटेल एस फोर जी या ठिकाणी शनिवारी (ता. १६) सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमामध्ये मंगेश चिवटे बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस दलातील अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष तथा पुणे प्राईम न्युजचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे, तालुकाध्यक्ष संदीप बोडके, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, आरोग्यदूत युवराज काकडे, राजकीय, सामाजिक, शौक्षणिक, सहकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना चिवटे म्हणाले, प्रत्येक जण मनानं कधी ना कधी तुटलेला असतो. कुठलाही रंगीत खडू जेव्हा तुटलेला असतो, तेव्हा त्या खडूचा रंग देखील तसाच असतो. "बापु'ज डायरी" या पुस्तकातील आत्महत्यांच्या विषयीचा लेख वाचला, तर ज्याच्या कुणाच्या मनात आत्महत्येचा विचार आलेला आहे. तो नक्कीच आत्महत्येपासून परावृत्त होईल. एवढ्या ताकदीचा हा लेख बापू यांनी लिहिला आहे.

तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलं आहे. त्याची सुरुवात शाळकरी वयामध्ये होते. मुलं एनर्जी ड्रिंक पितात आणि मग हळूहळू व्यसनाधीनतेकडे जातात. एका जागतिक अहवालानुसार सन २०५० पर्यंत जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी ५०% म्हणजे निम्म्या लोकांना कॅन्सर होईल. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन चिवटे यांनी केले.          

यावेळी बोलताना बी. एल. स्वामी म्हणाले की, राजकारणाच्या आखाड्यात सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी हरवले आहेत. त्याचा विचार करून बापू'ज डायरीमध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने मांडली आहे. पुस्तक वाचल्यानंतर हे विचार हे बापू काळभोर यांचे आहेत की मोठ्या बापूंचे आहेत, असा प्रश्न पडतो. "बापु'ज डायरी"तील बरेच विषय शालेय पाठ्यपुस्तकात येण्यासारखे आहेत.

बातमीच्या पलीकडे काही विषय असतात ते आपण वर्तमानपत्रात लिहू शकत नाही. असे विषय बापूंनी पुस्तकात हाताळले आहेत. बापू दिसायला एकदम मावळ्यांच्या काळातील राहणीमान असलेले व्यक्तीमत्त्व असून त्यांचा स्वभाव फार मृदू आणि संवेदनशील आहे. कारण संवेदनशील विषयांवर सर्वसामान्यांना समजेल, अशा साध्या मराठीत पुस्तक लिहिणं ही साधी गोष्ट नाही. या पुस्तकात वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत. ते अत्यावश्यक आहेत, असेही स्वामी यांनी सांगितले.                   

अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील म्हणाले की, पत्रकारितेच्या पलीकडे सुद्धा दुसरे जग आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर बापूंनी अनेक विषयांवर लिहायला सुरुवात केली. त्यांनी सामाजिक विषयांवर खूप चांगल्या पद्धतीने थोडक्यात छोटे छोटे लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखणीतून त्यांची संवेदनशीलता व तळमळ दिसून येते. "बापु'ज डायरी" या पुस्तकामध्ये बापू यांनी केवळ समाजातील गंभीर विषय मांडले नाहीत, तर त्यावर उपायसुद्धा सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या संवेदनशील पत्रकार, लेखकाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जगताप यांनी व सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. उपस्थितांचे आभार अमोल अडागळे यांनी मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER