Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न

लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव

टीम : धैर्य टाईम्स
पत्रकारांवर अन्याय झाला की सर्वप्रथम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. रमेश आढाव. नवोदित पत्रकारांना त्यांनी कायम प्रोत्साहन दिले, अडचणीच्या काळात आधार दिला आणि पत्रकारितेतील नैतिक मूल्ये जपण्याचा आग्रह धरला. म्हणूनच ते अनेकांसाठी मार्गदर्शक, गुरु आणि प्रेरणास्थान ठरले

"पत्रकारिता ही केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे." हा विचार आपल्या कार्यातून जपणारे सातारा जिल्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्रा. रमेश आढाव सरांचा प्रथम स्मृतिदिन शनिवार दिनांक १८ जुलै २०२६ रोजी होत आहे. सरांचा स्मृतिदिन म्हणजे त्यांच्या संघर्षमय, तत्त्वनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेचे स्मरण करण्याचा दिवस आहे.


प्रा. रमेश आढाव यांनी आयुष्यभर सत्य, न्याय आणि जनहित यांना सर्वोच्च स्थान दिले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि लोकहिताच्या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या लेखणीत धार होती, पण त्याचबरोबर संवेदनशीलताही होती. त्यामुळे ते केवळ पत्रकार नव्हते, तर समाजाचे जागरूक मार्गदर्शक होते.


विशेष म्हणजे, पत्रकारांवर अन्याय झाला की सर्वप्रथम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. रमेश आढाव. नवोदित पत्रकारांना त्यांनी कायम प्रोत्साहन दिले, अडचणीच्या काळात आधार दिला आणि पत्रकारितेतील नैतिक मूल्ये जपण्याचा आग्रह धरला. म्हणूनच ते अनेकांसाठी मार्गदर्शक, गुरु आणि प्रेरणास्थान ठरले.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश त्यांनी पत्रकारांना कृतीतून दिला. तर स्वामी विवेकानंदांचे "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका" हे विचार त्यांच्या कार्यातून सतत प्रतिबिंबित होत राहिले.


संत तुकाराम महाराज म्हणतात, "सत्य असत्याशी मन केले ग्वाही." सत्याची बाजू घेणे, निर्भीडपणे प्रश्न विचारणे आणि समाजहितासाठी लेखणी चालवणे, हीच प्रा. रमेश आढाव यांच्या पत्रकारितेची खरी ओळख होती.


प्रा. रमेश आढाव हे माझ्यासाठी केवळ ज्येष्ठ पत्रकार नव्हते, तर ते माझ्या गुरुस्थानी होते. पत्रकारितेकडे पाहण्याची दृष्टी, सत्यासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची हिंमत, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची जिद्द आणि पत्रकारितेतील नैतिक मूल्यांची जपणूक हे सर्व त्यांच्या सहवासातून शिकण्याचे भाग्य मला लाभले.


 ग्रामीण भागातील पत्रकारांचे आश्रयाचे स्थान म्हणजे प्राध्यापक रमेश आढाव सर यांचे कार्यालय. ग्रामीण भागातील पत्रकार यांच्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांना न्याय देण्याचे काम सरांनी नेहमीच केली आहे. पत्रकार संघटनेला बळ देण्याचे काम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केले. 


 अंधश्रद्धे विरुद्ध मोठा लढा :


 गुणवरे तालुका फलटण हे प्राध्यापक रमेश आढाव सरांचे गावं. या गावातील जत्रेमध्ये अंधश्रद्धेतून गावातील मंदिराला धडका घेण्याचे अमानवीय काम महार ( बौद्ध ) समाजातील लोकांना करावे लागत होते. मात्र हे अमानवीय काम समाजावर मोठा अन्याय असल्याचे आढाव सरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठया संघर्षात बंद करण्यास भाग पाडले. व एक इतिहास निर्माण केला. कदाचित हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल. 


 सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. 2009 साला मध्ये फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राजकीय पक्षांकडून मिळेल अशी अपेक्षा केली गेली होती. मात्र नेतृत्व करण्याची प्रतिभा असून सुद्धा त्यांना राजकीय संधी पासून दूर लोटले गेले. यामध्ये त्यांच्या वर जातीय समीकरणातून अन्याय झाल्याची चर्चा आजही दबक्या आवाजात ऐकायला येते.

लिहण्यासारखे खूप आहे... मात्र तूर्तास.. इथेच थांबू...


एक म्हण आहे, "गुरूविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना दिशा नाही." माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात प्रा. रमेश आढाव यांनी दिलेली दिशा, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे संस्कार हे माझ्यासाठी अमूल्य आहेत. त्यांचे ऋण कधीही फेडता येणार नाही.


आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांची निर्भीड पत्रकारिता कायम प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना मन भरून येते; मात्र त्यांनी दिलेली मूल्ये जपणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचे कार्य, विचार आणि मूल्ये नव्या पिढीतील पत्रकारांसाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली म्हणजे निर्भय, निःपक्षपाती आणि लोकहिताची पत्रकारिता जिवंत ठेवणे होय.


सातारा जिल्यातील ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि पत्रकारितेतील लढवय्ये योद्धा प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.


सचिन मोरे, संपादक धैर्य टाईम्स, फलटण 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER