Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग

भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता

टीम : धैर्य टाईम्स

भारतीय शेती झपाट्याने बदलत आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीस कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष यामुळे सुरक्षित आणि शाश्वत पीकसंरक्षणाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे. अशा काळात भारतीय संशोधनावर आधारित के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य (Botanical) पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून मिळालेली मान्यता ही भारतीय कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरत आहे.


संशोधनातून साकारलेलं पीकसंरक्षण तंत्रज्ञान


के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे संचालक मा. श्री. सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये एका छोट्याशा संशोधन केंद्रातून वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रवास सुरू झाला. कंपनीच्या संशोधन व विकास (R&D) विभागाने अनेक वर्षे सातत्याने काम करत वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले.


या संशोधनासाठी ७५ हून अधिक संशोधकांनी तीन वर्षे सातत्याने काम केले. हजारो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रांचा अभ्यास, जैव कार्यक्षमता, विषारी परिणाम, पर्यावरणीय सुरक्षितता तसेच बरेच दस्तऐवजीकरण पूर्ण करण्यात आले. भारतातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या हवामान आणि हंगामात चाचण्या घेऊन या तंत्रज्ञानाची वैज्ञानिक पडताळणी करण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतरच केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून अधिकृत नोंदणी प्राप्त झाली.


दोन वनस्पतीजन्य फॉर्म्युलेशन्सला सेक्शन 9(3) अंतर्गत मान्यता


या नोंदणीअंतर्गत फंगो रेझ (थायमॉल आधारित वनस्पतीजन्य बुरशीनाशक) आणि थ्रिप्स रेझ (पायपरीन + थायमॉल आधारित वनस्पतीजन्य कीटकनाशक) या दोन फॉर्म्युलेशन्सना अधिकृत मान्यता आणि पेटंट मिळाले आहे.


विशेष म्हणजे ही दोन्ही उत्पादने ४८ तासांत प्रभाव दाखवतात. तसेच त्यांचा पीक काढणी कालावधी (PHI) शून्य असल्याने काढणीपूर्वी फवारणी करूनही निर्यातीसाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यास मदत होते. एम.आर.एल. निकषांच्या पार्श्वभूमीवर ही बाब निर्यातक्षम पिकांसाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.


निर्यात आणि जागतिक बाजारपेठेला चालना


सध्या के.बी. बायो ऑरगॅनिक्स भारतातील ११ राज्यांमध्ये कार्यरत असून केनिया आणि दक्षिण अमेरिका यांसह तब्बल ३२ देशांमध्ये निर्यात करत आहे. कंपनीच्या या नोंदणीमुळे भारतीय वनस्पतीजन्य तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.


आजपर्यंत सक्रिय घटकांसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र के.बी. बायो ऑरगॅनिक्सला या नवीन तंत्रज्ञानाला मिळालेल्या मान्यतेमुळे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय पद्धतीने शेती करून निर्यातीसाठी दर्जेदार उत्पादन घेणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक चांगला दर मिळवणे आता अधिक सोपे झाले आहे.


विशेषतः युरोपीय, अमेरिकन आणि आफ्रिकन देशांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी प्रभावी वनस्पतीजन्य पीकसंरक्षण उत्पादनांची मागणी वाढत आहे. यामुळे भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासोबतच निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


द्राक्षे, डाळिंब, भात, चहा, मसाले यांसारख्या निर्यातक्षम पिकांसाठी कमाल औषध मर्यादा (एम.आर.एल.) निकष पाळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अमेरिका, युरोप, अरब देशांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे भारतीय मिरची, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांच्या काही निर्यात कंटेनर्सना नकार देण्यात आल्याची उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. या औषधांमुळे होणारे नुकसान भारताला टाळता येणार आहे.


रासायनिक अवशेषांचे वाढते महत्त्व देशांतर्गत बाजारपेठेतही दिसून येत आहे. मागील वर्षी मध्य प्रदेश शासनाने मंजूर नसलेल्या रासायनिक अवशेषांचे प्रमाण आढळलेल्या सोयाबीन पिकाची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून भविष्यात सुरक्षित व मान्यताप्राप्त पीकसंरक्षण उपायांचा स्वीकार करणे ही केवळ निर्यातीची नव्हे, तर देशांतर्गत बाजारपेठेचीही गरज ठरणार असल्याचे स्पष्ट होते. कारण भारत सरकारही त्यादृष्टीने पावले उचलत आहे.


येत्या काळात जैविक पीकसंरक्षण उत्पादनांची जागतिक मागणी वाढण्याची शक्यता असून, या क्षेत्रात के.बी. बायो ऑरगॅनिक्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत सुमारे ६६ टक्के वाढ, तर मधुमेहाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अन्न आणि रासायनिक अवशेष कमी असलेल्या शेतीपद्धतीचे महत्त्व अधिक वाढत आहे.


एकंदरीतच अन्नसुरक्षिततेत व उत्पादनात या परवानगीमुळे मदत होणार आहे. यामुळे भारतात सेंद्रिय शेतीचे एक नवीन पर्व सुरू होईल यात शंका नाही.


के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन यादव म्हणाले, "ही मान्यता म्हणजे भारतीय संशोधनाचा, शाश्वत शेतीचा आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या विश्वासाचा सन्मान आहे. २०५० पर्यंत 'प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न' हे ध्येय पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि नवकल्पनांचा प्रवास यापुढेही सुरू राहील."


के.बी. बायो ऑरगॅनिक्सला मिळालेली ही केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) मान्यता वनस्पतीजन्य पीकसंरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ही मान्यता केवळ उत्पादनांची नोंदणी नसून भारतीय संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीला मिळालेले बळ मानली जात आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER