फलटण प्रतिनिधी
मौजे वाखरी ता फलटण गावच्या हद्दीतील इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर मधील ५० किलो वजनाची कॉपर वायर अज्ञात व्यक्तीने चोरुल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ रोजीचे सकाळी ७ वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहीत नाही) मौजे वाखरी ता फलटण गावच्या हद्दीतील मोहिते डी पी नावाचा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर याची १०० केव्ही ए क्षमता असलेला इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर खाली पाडून ट्रान्सफर मधील २ हजार रुपये किमतीचे ४० लिटर ऑइल सांडून नुकसान केले व त्यातील २० हजार रुपये किमतीची ५० किलो वजनाची कॉपर वायर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून चोरून नेहली. याप्रकरणी तानाजी महादेव मुळीक (वायरमन म. रा. वि. वि.कंपनी शाखा कार्यालय फलटण ग्रामीण शाखा नंबर १ रा. कोळकी ता फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याच्या अधिक तपास पोलिस नाईक जगदाळे करत आहेत.