Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ - उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

टीम : धैर्य टाईम्स

मुंबई, : १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे. 

कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती


संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                               


आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

संविधान मंदिर


राज्यातील आयटीआयमध्ये संविधान मंदिराची स्थापना केली जाईल. या मंदिराच्या माध्यमातून संविधानाची शिकवण आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार सुद्धा नित्यनियमाने होईल. या ठिकाणी विविध शैक्षणिक कार्यक्रम, परिसंवाद, संवैधानिक घटनांचे स्मरण आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी २५०० महाविद्यालयात प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना


महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला स्टार्टअप्सला निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे १००० स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "अनेक कौशल्य संपन्न आणि नीतिमंत व्यक्तिमत्वांनी भारत देशाला घडवण्यासाठी योगदान दिले आहे. आज त्यांच्या मेहनतीमुळे आपण आजवर इतकी प्रगती करू शकलो आहोत. संविधान मंदिराच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्व, येणाऱ्या पिढीला समजावे हा आमचा प्रयत्न आहे. येणारा काळ हा युवाशक्तीचा आहे, भारतातील युवकांसाठी सुवर्ण संधींचा आहे. त्यामुळे या युवकांना कौशल्य संपन्न आणि नीतिमंत बनवणे मी आपली जबाबदारी समजतो. असाच युवा फक्त भारतालाच नाही, तर जगाला सुद्धा उज्ज्वल भविष्याकडे नेण्याची ताकद बाळगतो. संविधान मंदिर आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे. नक्कीच युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. आदरणीय उपराष्ट्रपती जगदीप धनखडजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कार्यक्रमास येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो!"
 
 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER