फलटण प्रतिनिधी :- मौजे दुधेबावी येथील ग्राम तलावातून अज्ञात व्यक्तीने अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची दहा ब्रास वाळू चोरून नेल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमाराला मौजे दुधेबावी तालुका फलटण गावचे हद्दीत दुधेभावी ते गिरवी जाणारे रोड लगत असणारा ग्राम तलाव येथे अज्ञात व्यक्तीने अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची दहा ब्रास वाळू बेकायदा बिगर परवाना वाळू उत्खनन करून चोरून नेली आहे म्हणून अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्यादी तलाठी राहुल भानुदास इंगळे (रा. कोळकी ता. फलटण जि. सातारा) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा पोलीस फौजदार खाडे करत आहेत.