फलटण प्रतिनिधी:- जिंती येथे कचरा टाकायला जात असताना एकास चार जणांनी कुऱ्हाड व काठीने मारहाण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ रोजी सकाळी ६:३० दरम्यान फिर्यादी शोभा बाळू रणवरे (रा. जिंती ता. फलटण) यांचे पती बाळू हे कचरा टाकायला जात असताना यातील संशयीत आरोपी रवींद्र दिनकर वाघमारे यांनी हातातील कुऱ्हाडीने फिर्यादी यांचे पती बाळू यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर व छातीवर कुऱ्हाडीने वार केले संशयीत आरोपी राहुल दिनकर वाघमारे यांनी हातातील काठीने मारहाण केली संशयीत आरोपी विशाल राजेंद्र वाघमारे व आनंद राजेंद्र वाघमारे यांनी हाताने लाथाने मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी यांचे पतीवर पुणे येथे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याने फिर्याद देण्यास उशिर झाला असून याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात रवींद्र दिनकर वाघमारे, राहुल दिनकर वाघमारे, विशाल राजेंद्र वाघमारे, आनंद राजेंद्र वाघमारे (सर्व राहणार जिंती ता. फलटण) यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार यादव करत आहेत.