Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

६ जानेवारी पत्रकार दिन पोंभुर्ले येथे शासकीय कार्यक्रम व्हावा यासाठी मी आग्रही : ना.रवींद्र चव्हाण

टीम : धैर्य टाईम्स

पोंभुर्ले, दि.६ : "पत्रकार दिनाचे कार्यक्रम राज्यात सर्वत्र होत असतात; पण बाळशास्त्रींच्या जन्मभूमीतील या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी शासकीय कार्यक्रम झालाच पाहिजे यासाठी मी आग्रही आहे", असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या वतीने पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार वितरण समारंभात ना. चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ होते. व्यासपीठावर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ. प्रियांका धावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चव्हाण पुढे म्हणाले, "पोंभुर्लेत शासकीय कार्यक्रम झाल्यास या कार्यक्रमाची उंची आणखी वाढेल. एकदा प्रशासन आले की, प्रशासनामुळे समृद्धी येते. यातून गावाचा विकास होईल. बाळशास्त्रींच्या नावे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांना फार मोठी प्रतिष्ठा आहे. समाजामधील अडचणींना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात. राज्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली आहे. जांभेकरांसारख्या व्यक्ती आजही समाजमनावर राज्य करत असतात. त्यांचे मुंबईत स्मारक व्हावे या रवींद्र बेडकेहाळ यांच्या मागणीच्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठकीचे निश्चितपणे आयोजन करू. तसेच इथून पुढे प्रत्येक पत्रकार दिनाला आपण पोंभुर्ले येथे उपस्थित राहू", असेही ना. चव्हाण यांनी सांगितले.

आयोध्या राम मंदिरावरून जन्मभूमीला किती महत्त्व असते हे सिद्ध झाले आहे. बाळशास्त्रींचे समग्र दर्शन व्हावे या उद्देशाने आम्ही त्यांच्या जन्मभूमीत या स्मारकाची उभारणी केली आहे. या महापुरुषाची महती लक्षात घेऊन पोंभुर्ले गावचा विकास व्हावा व कर्मभूमी मुंबईत त्यांचे स्मारक व्हावे", अशी अपेक्षा रवींद्र बेडकीहाळ यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केली. यावेळी डॉ जगदीश कदम, कैलास म्हापदी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी बाळशास्त्रींच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ३१ व्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सम्पन्न झाले. यामध्ये राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार डॉ.सागर देशपांडे (पुणे), कैलास म्हापदी (ठाणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार - सौ.कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार - डॉ.भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार - शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता.फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांचा समावेश होता.

मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, रोहित वाकडे, अरुण खरात यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विश्वस्त अमर शेंडे यांनी मानले.

कार्यक्रमास जिल्हा महिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पोंभुर्ले गावचे उपसरपंच सादिक डोंगरकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER