Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संघटन रचनेचे धडे

चचेगाव येथे निवासी प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद
टीम : धैर्य टाईम्स
Lessons on organization formation for BJP office bearers
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा पदाधिकारी यांचे दोन दिवसीय पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण शिबिर ओम लॉन्स चचेगाव, कराड या ठिकाणी दि. 30 आणि 31 रोजी पार पडले. या शिबिरात 250 सदस्यांनी भाग घेतला होता.

सातारा : भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा पदाधिकारी यांचे दोन दिवसीय पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण शिबिर ओम लॉन्स चचेगाव, कराड या ठिकाणी दि. 30 आणि 31 रोजी पार पडले. या शिबिरात 250 सदस्यांनी भाग घेतला होता.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण शिबिरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहेत. पदाधिकाऱ्यांना उपयुक्त असणारे आणि भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांची संपूर्ण माहिती या प्रशिक्षण वर्गामध्ये दिली जात असते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये याप्रकारच्या शिबिरांचे आयोजन करून पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून, त्यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करायचे, या उद्देशाने कार्यकर्ते-पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जातात. या आधी सातारा जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग आणि ग्रामीण भागात प्रशिक्षण शिबिरे झाली आहेत.
सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांसाठी, जिल्हा संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वडणे, सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल, विट्ठल बलशेटवार, सचिन घाटगे, भरत मुळे यांनी चचेगाव कराड येथे व्यवस्थित नियोजन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांना अनेक विषयांची माहिती देण्यात आली. केंद्र सरकारी योजना, प्रशिक्षणाचे महत्त्व, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, भाजपचा इतिहास व विकास, कार्यपद्धती आणि संघटन संरचनेतील भूमिका, निवडणूक व्यवस्थापनाचे महत्त्व, कृषी कायदे वास्तव आणि विपर्यास, भारताचे वाढते सामर्थ्य, जागतिक योगदान आणि बदलत्या परिस्थितीमध्ये भाजपाचे नेतृत्वाचे महत्त्वाचे योगदान या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्चा माजी प्रदेशाध्यक्षा माधवीताई नाईक, प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवनाना काळे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत नाना पाटील यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच सातारा शहराध्यक्ष आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER