फलटण प्रतिनिधी:- कुरेशी नगर येथे एका चारचाकी गाडीमध्ये 250 किलो वजनाचे कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस सापडल्या प्रकरणी एक जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ रोजी ५:२० वाजण्याच्या सुमारास माशाअल्लाह हॉटेलचे समोर कुरेशी नगर फलटण येथे सिल्व्हर रंगाची सिल्वहर रंगाचे मारूती सुझुकी ओमिनी गाडी क्र. MH.14.AV.4017 या वाहनात पाठीमागील सिटवर तसेच डिकीमध्ये २५ हजार रुपये किंमतीचे अंदाजे 250 किलो वजनाचे कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस मांसाचे तुकडे काळ्या रंगाचे प्लास्टिकच्या कागदात भरलेले आढळून आले. यावेळी २५ हजार रुपये किंमतीचे अंदाजे मास व १ लाख ५० हजार रुपये किंमतीची गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शाहरूख जलिल कुरेशी (रा.मंगळवार पेठ फलटण) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कदम हे करीत आहेत.