Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा 2022 साठीप्रवेश अर्ज दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु

टीम : धैर्य टाईम्स
मतदार यादीतील दुबार नांवे वगळण्यासाठी मतदार  ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून तर घरगुती पातळीवर गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणा-या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येईल. तसेच मताधिकार बजावताना , जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्यातून- सजावटीतून जागृती करुन लोकशाही समृध्‍द करता येईल.

सातारा दि. 17: गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशोत्सवामध्ये "माझा गणेशोत्सव  माझा  मताधिकार" ही स्पर्धा  आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव व सजावटीसोबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही या स्पर्धेत सहभागी  व्हावे,  असे आवाहन उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा  निवडणूक अधिकारी  निता सावंत-शिंदे  यांनी केले आहे.

दरवर्षी गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरुन जाते. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने "माझा गणेशोत्सव  माझा  मताधिकार" या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट – देखावा स्पर्धा  आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. या स्पर्धेचा विषय "माझा गणेशोत्सव  माझा  मताधिकार" हा आहे. मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नांव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नांवे वगळण्यासाठी मतदार  ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून तर घरगुती पातळीवर गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणा-या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येईल. तसेच मताधिकार बजावताना , जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्यातून- सजावटीतून जागृती करुन लोकशाही समृध्‍द करता येईल.

गणेशोत्सव देखावा सजावट  स्पर्धा 2022 साठी प्रवेश अर्ज दि. 31  ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार आहे. स्पर्धेसाठी  दि. 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी  ग्राह्य धरले जाईल.

स्पर्धेची नियमावली

सदर स्पर्धा वैयक्तिक  (घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे  अशा दोन्हीसाठी  असून घरगुती  स्पर्धेत साहित्य पाठविण्यासाठी  मताधिकार, आधार जोडणी, निवडणूक, लोकशाही  या विषयाला अनुसरुन  केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे विविध कोनातून काढलेले पाच फोटो पाठवावेत. प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त 5 MB   साईजचा व  JPG फॉरमॅटमध्येच असावा. मताधिकार, आधार जोडणी, निवडणूक, लोकशाही  या विषयाच्या देखाव्याची ध्वनीचित्रफीत ( व्हिडीओ) गुगल अर्जावर जोडावी. ध्वनीचित्रफीत ( व्हिडीओ)  आणि फोटो गुगल अर्जावर जोडताना  त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. चित्रफितीला  आवाजाची जोड देवू शकता. ध्वनीचित्रफीतीची  ( व्हिडीओची )  साईज जास्तीत जास्त 100 MB असावी. तसेच ही  ध्वनीचित्रफीत mp4  फॉरमॅटमध्ये असावी व ती एक ते दोन मिनीटांची असावी.

सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मताधिकार, आधार जोडणी, निवडणूक, लोकशाही  या विषयाला अनुसरुन  केलेल्या देखाव्याचे विविध कोनातून काढलेले पाच फोटो पाठवावेत. प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त 5 MB   साईजचा व  JPG फॉरमॅटमध्येच असावा. गणेशोत्सव मंडळामध्ये केलेल्या  मताधिकार, आधार जोडणी, निवडणूक, लोकशाही  या विषयाच्या देखाव्याची ध्वनीचित्रफीत ( व्हिडीओ) गुगल अर्जावर जोडावी. ध्वनीचित्रफीत ( व्हिडीओ)  आणि फोटो गुगल अर्जावर जोडताना  त्यावर मंडळाचे किंवा मंडळातील कुणा व्यक्तीचे नाव व लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. ध्वनीचित्रफीतीची  ( व्हिडीओची )  साईज जास्तीत जास्त 500 MB असावी. तसेच ही  ध्वनीचित्रफीत mp4  फॉरमॅटमध्ये असावी व ती  10 मिनिटांपेक्षा अधिक असू नये. गणेशोत्सव मंडळांनी सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे  नाव लिहून त्यानंतर डॅशचे चिन्ह ( - )  देवून अध्यक्ष किंवा सचिव यांचे नांव लिहावे.( उदा. घोलाईदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – मंदार मोरे ) आणि पुढे त्याच व्यक्तीचा पत्ता आणि मोबाईल  क्रमांक लिहावा. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गुगल अर्जावर जोडावे. या पत्राचा नमुना  गुगल अर्जावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

स्पर्धकांनी आपले फोटो आणि ध्वनिचित्रफीत https://forms.gle6j7ifuUA4YSRZ6AU7   या गुगल अर्जावरील माहिती भरुन त्यावर पाठवावेत. ज्या स्पर्धकांना  फोटो किंवा  ध्वनीचित्रफीत पाठवण्यास अडचण येईल , त्यांनी 8669058325 (प्रणव सलगरकर), 9987975553  (तुषार पवार ) या व्हॉटसॲप क्रमांकावर संदेश पाठवून कळवावे.

बक्षिसांचे स्वरुप-

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी   बक्षिसांचे स्वरुप प्रथम क्रमांक 51,000/-, व्दितीय क्रमांक 21,000/-, तृतीय क्रमांक 11,000/-  असून उत्तेजनार्थ  5,000/- रुपयांची  एकूण दहा बक्षिसे असणार आहेत.

घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी  बक्षिसाचे स्वरुप प्रथम क्रमांक 11,000/-, व्दितीय क्रमांक 7,000/-, तृतीय क्रमांक 5,000/-  असून उत्तेजनार्थ  1,000/- रुपयांची  एकूण दहा बक्षिसे असणार आहेत.

 सहभागी  सर्व  स्पर्धकांना  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. आलेल्या देखाव्या सजावटीमधून सर्वोत्तम देखावे सजावटी निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठविलेल्या साहित्यावर अन्य कुणी  स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची राहील.  निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी/अधिकारी स्पर्धेत सहभागी होवू शकतात. मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. स्पर्धेची अधिक माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर  https://ceo.maharashtra.gov.in/  उपलब्ध असल्याची माहिती  उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER