Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे

निंभोरे येथे सख्ख्या भाऊ-बहिणीचा खून : संशयिताला १० तासात फलटण पोलिसांनी केली अटक

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील (पालखी महामार्ग) निंभोरे, ता. फलटण येथे सुमित तुकाराम शिंदे, वय २० व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके, वय ३५ या बहीण-भावाचा निघृण खून करण्यात आला. या दुहेरी खून प्रकरणातील संशयिताला फलटण ग्रामीण पोलिसांनी केवळ १० तासांमध्येच अटक केली.

चारित्र्याच्या संशयावरून हे खून झाल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणातील संशयित रणजित मोहन फाळके, मूळ रा. सातारारोड, ता. कोरेगाव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निंभोरे, ता. फलटण येथे पालखी महामार्गालगत असलेल्या झोपडीवजा घरात शीतल व सुमित हे बहीण-भाऊ त्यांच्या आई वडिलांसमवेत राहत होते. त्यांच्या समवेत शीतल व रणजित फाळके हे पती-पत्नीप्रमाणे रहात होते. शनिवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास पालखी महामार्गालगत सुमित तुकाराम शिंदे व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके या बहीण भावाचा धारदार शस्त्राने वार करून निघृण खून करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास करत असताना मृत शीतल हिने २ वर्षापूर्वी पहिल्या नवऱ्यास सोडून दिले होते. त्यानंतर ती रणजित फाळके याच्यासमवेत निंभोरे येथे तिच्या आई- वडिलांजवळ त्यांच्या झोपडीत राहत होती. घटना घडली त्यावेळी रात्री फाळके हा त्यांच्यासमवेत झोपडीत झोपला होता. सकाळी मृतदेह मिळाल्यानंतरही तो तिथेच फिरत होता. परंतु घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहून त्याने तेथून काढता पाय घेतला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे त्यास सातारारोड येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सुरुवातीस त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दि. २५ मे रोजी मध्यरात्री शीतल ही परपुरुषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे मी झोपडीतील चाकू घेऊन तिच्या मागे गेलो. काही अंतरावर गेल्यानंतर शीतलला गाठून मी तिच्या छातीत चाकूने वार करून तिचा खून केला. त्यावेळी तिच्यासमवेत असलेला तिचा भाऊ सुमित शिंदे यास अंधारात न ओळखल्यामुळे तो परपुरुष आहे, असा गैरसमज होऊन आपण त्याच्याही छातीत चाकू खुपसून त्याचाही निघृण खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी रणजित फाळके याच्यावर कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाळके हा खुल्या प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ करण्यात आली. पोलिसांनी फाळके यास अटक केली आहे.

सदर तपास पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावत संशयिताला जेरबंद केले आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER