सातारा दि. 9 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वाई येथे 9 ते 18 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत,पंचायत समिती, नगरपालिका कार्यालयात ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ध्वज संहितेचे पालन करून नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज फडकवावे.
दि. ९ ऑगस्ट रोजी जांब येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार,किसन वीर स्मारक कवठे येथून प्रभात फेरीने वीर कुटुंबीयांच्या घरी भेट व कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. १० ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर महिला बचत गटांच्या मेळाव्याद्वारे महिलांची आर्थिक साक्षरता व ७५ बचत गटांना कर्ज वितरण व उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.याच दिवशी किकली येथे महिला व किशोरींसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीने महिला मेळावा निबंध,पाककला स्पर्धा व व्याख्यान होणार आहे.
११ ऑगस्ट रोजी परखंदी येथे सैनिक माजी सैनिकांचा सत्कार व प्रभात फेरी कार्यक्रम होईल.बोपेगाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दि.१२ ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर पंचायत समिती किसन वीर सभागृहात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.याच दिवशी कणूर येथील महिला ग्रामसभेत ९६ महिला विधवा प्रथेतून मुक्त होणार आहेत. केंजळ येथे स्तनपान सप्ताह, पूरक पोषक आहार प्रदर्शन व स्तनदा मातांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि.१३ ऑगस्ट रोजी वेळे ग्रामपंचायत व दानशूरांच्या सहकार्याने २०० मुलांची 'गोपाळांची पंगत' आयोजित करण्यात आली आहे. पंगतीत विद्यार्थ्यांना केळी, खजूर आदी पौष्टिक फळांचे वाटप करण्यात येणार आहे. खानापूर येथे वृक्षारोपण व पर्यावरण जागृती,भुईंज येथे किशोरी मेळाव्यात आहार आरोग्य व शारीरिक बदलांविषयी मार्गदर्शन आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे.सकाळी ७५ शिक्षक सायकल रॅलीने खानापूर येथे जाऊन वृक्षारोपण करणार आहे.
दि.१४ ऑगस्ट रोजी पसरणी येथून पर्यावरण जागृती सायकल रॅली वाई व पुन्हा पसरणी येथे जाईल. दि.१५ ऑगस्ट रोजी तालुकास्तर रांगोळी व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उडतरे येथे ७५ ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. याच दिवशी दरेवाडी गावातील महिला १०० टक्के कचरामुक्त गाव व घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम स्वयंप्रेरणेने राबविणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १७ ऑगस्ट रोजी पंचायत समिती,वाई येथे करण्यात येणार आहे.देशभक्त किसन वीर यांच्या जयंतीदिनी अमृत महोत्सव कार्यक्रमांची सांगता किसन वीर यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रवेशांचे सादरीकरणाने व बक्षीस वितरण समारंभाने होईल, या कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
चांदवडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होणार विविध उपक्रमांनी साजरा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त चांदवडी येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत दहा दिवस विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी मेळावा, महिला मेळावा, किशोरी मेळावा, सायकल रॅली, वृक्षारोपण, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गोपाळ पंगत, शालेय स्पर्धा यासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आरोग्य विषयक जनजागृती
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ग्रामपंचायत कण्हेर ( ता जि सातारा) येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत नियोजन चर्चा व ठराव करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामसभेत आलेल्या सदस्यांना व नागरिकांना आरोग्य विषयक माहीती दिली. तसेच पांचगणी उपकेंद्र:- भिलार अंतर्गत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली तेव्हा आरोग्य विषयक माहिती देण्यात आली . संसर्ग्यजन्य, असंसर्गजन्य आजारांबाबत माहिती .उपकेंद्र विसापूर ता. खटाव येथे विशेष ग्रामसभे मध्ये नागरीकांना कोव्हीड लसीकरण बुस्टर डोस तसेच NCD तपासणी शिबीर, महिलांसाठी आरोग्य शिबीर इ.विषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच उपकेंद्र कटगुण येथे विशेष ग्रामसभे मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सविता वाघ यांनी नागरीकांना कोव्हीड लसीकरण बुस्टर डोस तसेच NCD तपासणी शिबीर, H b तपासणी , महिलांसाठी आरोग्य शिबीर इ.विषयी सविस्तर माहिती दिली त्यावेळी उपकेंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते
लोणंद येथे वृक्षारोपण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वनपरिक्षेत्र- खंडाळा वनपरिमंड -लोणंद व श्री भैरवनाथ डोंगर ग्रुप, लोणंद यांचे संयुक्त विद्यमाने आज रोजी मौजे लोणंद वनक्षेत्रातील भैरवनाथ मंदिर परिसरात सिताफळ ,चिंच रोपे लागवड करण्यात आली.