फलटण : मागील काही दिवसांपासून क्रांतिभूमी फलटण येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरून फुले प्रेमी व फलटण पालिका यांच्या मध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळाला आज फुले प्रेमींच्या आराखड्या नुसार प्रत्यक्ष कामास सुरवात झाली महात्मा फुले यांच्या विचारांचे दर्शन या क्रांतिभूमीत साकारले जाईल त्या मध्ये महात्मा फुले यांचे साहित्य, त्यांचे अखंड काव्यातील ओव्या प्रशस्त असा चौथरा आकर्षक विद्युत रोषणाई व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जाणार असल्याचे गोविंद भुजबळ यांनी महात्मा फुले जयंती उत्सव समिती तर्फे सांगितले
पुतळा एक इंचही न हलवता त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे ही आग्रही मागणी जयंती उत्सव समिती पहिल्या पासून करत होती यासाठी फलटणच्या दोन्ही राजकीय गटांकडून फुलेंचा पुतळा हा फुलेंप्रेमीच्या आराखड्यानुसारच होईल व तो एक इंच ही हलवला जाणार नाही अशी भूमिका घेतली दोन्ही गटातील फुले प्रेमींनी आराखडा समजून सांगताना हा आराखडा फुले प्रेमींनी स्वतः बनवला असल्याने त्या नुसारच काम व्हावे ही ठाम भूमिका जयंती उत्सव समितीने घेतली आहे
२०१६ पासून पुतळा समिती ने पालिके मार्फत दोनदा ठराव केले होते यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त पुतळा करावा ही पहिली मागणी तांत्रिक अडचणीत अडकल्या नंतर क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा त्याच चौकात बसवण्यात यावा असा ठराव २०२१ ला करण्यात आला कोरोना च्या काळात हे काम झाले नाही नंतर मुदत संपल्याने पालिकेवर प्रशासक नेमल्याने काम झाले नाही
मागील आठवड्यात फुले प्रेमींनी आंदोलन करत पालिकेवर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले यामध्ये पुतळा सुशोभीकरण त्वरित व्हावे व त्याची जागा बदलू नये अशी मागणी करण्यात आली आज प्रत्यक्ष या कामास सुरवात झाली असून महात्मा फुले जयंती पूर्वी काम पूर्ण करावे अशी मागणी फुले प्रेमींनी केली आहे
यावेळी जयंती उत्सव समितीचे प्रमुख बापूराव शिंदे,गोविंद भुजबळ, मुनीष जाधव विजय शिंदे, सागर अभंग विकास नाळे बाळासाहेब घनवट रणजित भुजबळ, कृष्णात नेवसे वैभव नाळे संदीप नेवसे बंडू शिंदे दत्ता नाळे अमोल शिंदे दीपक शिंदे विवेक शिंदे प्रवीण फरांदे अमोल शिंदे बाळासाहेब ननावरे सुभाष अभंग शनैश शिंदे ऋषीकेश शिंदे ज्योतिराम घनवट इत्यादी मान्यवर उपस्थित होते