जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे मॅडम यांचेशी फोन द्वारा संपर्क साधला व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथील व्यथा, तक्रार सांगितले नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली मॅडम यांनी तातडीने प्रतिसाद दिला व संबंधित आरोग्य अधिकारी यांना लवकरात लवकर सेकंड मेडिकल आफिसर नियुक्त केले जाईल असे आश्वासन दिले
लोणंद शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुमारे १५ दिवसांपासून दुपारी ४ नंतर ची ओपिडी संबंधित आरोग्य अधिकारी यांनी बंद केल्याने रुग्ण नागरिकांची गैरसोय होत आहे. याठिकाणी येणाऱ्या सर्व सामान्य रुग्णांना दुपार ४ वा. नंतरची ओपिडी बंद असल्याने उपचार अभावी आरोग्य समस्या पाचुन वंचित राहावे लागत आहे. अचानकपणे दुपार नंतर ची ओपिडी बंद झाले बाबत असताना याबाबत रुग्णांची होत असलेली गैरसोयीची माहिती सामाजिक कार्यकर्ते साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांना रुग्णांनी निदर्शनास आणून दिली.
कय्युम मुल्ला यांनी तातडीने महत्त्वपूर्ण आरोग्य आरोग्य समस्या निवारण होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे धाव घेतली व हकिकत जाणून घेतली, तर चक्क दुपार ४ वा. नंतर ची ओपिडी बंद राहिल असा फलक नोटीस बोर्ड मध्ये लावल्याचे समोर आले. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद चे वैद्यकीय अधिकारी बनसोडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे माझ्या वरिष्ठांना विचारा, सेकंड मेडिकल ऑफिसर आल्यानंतरच दुपारची ओपिडी सुरू होईल अशी उडवा उडवीची उत्तरे दिली.
यावेळी लोणंद शहरात पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतलेले रुग्ण दाखल झाले होते व तातडीने उपचार आवश्यक होते. याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे मॅडम यांचे शी फोन द्वारा संपर्क साधला व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथील व्यथा, तक्रार सांगितले नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली मॅडम यांनी तातडीने प्रतिसाद दिला व संबंधित आरोग्य अधिकारी यांना लवकरात लवकर सेकंड मेडिकल ऑफिसर नियुक्त केले जाईल असे आश्वासन दिले. संबंधित आरोग्य अधिकारी यांना ओपिडी सुरू करण्यासाठी सांगितले यामुळे उपस्थित रुग्ण व श्वान चावा झालेल्यांना तातडीने उपचार मिळालेने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथील आरोग्य अधिकारी यांचे दुपार ४ नंतर ची ओपिडी बंद ठेवण्याचा निर्णय या मनमानी अनागोंदी कारभारामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. सदर ओपिडी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सुरळीत सुरू राहावी व रुग्णांची गैरसोय दुर करावी अन्यथा समस्या निवारण होई तो पर्यंत तीव्र आंदोलन छेडु असा इशारा साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी दिला आहे.



















