Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील अजित दादांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का,त्यांचे खूप उपकार सातारा जिल्ह्यावर होते - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली कोळकी येथील दांपत्य अपघातात ठार कर्तव्य बजावत असताना तरडगावच्या सुपुत्रचा दुर्दैवी मृत्यू अजित पवार हे जनतेचे नेते होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर केली पोस्ट - उद्या अंत्यसंस्कार तरडगाव येथे राजेगटाला रामराम करीत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल : ॲड. सौ.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला विकासाचा शब्द जयकुमार या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ तरुण विजयी किंवा विजयाचा तरुण वडजल करांचा भाजपमध्ये प्रवेश, विष्णुपंत लोखंडे व धनंजय साळुंखे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देत आम्ही विकास पुरुष पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे केले स्पष्ट विडणी प्रमाणे धुळदेव,पिंपरद,माझेरी गावाचा विकास होईल, - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग कोळकी गावचे उद्योजक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशशेठ काशिद यांचा राजेगटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश राजेगटाला जबर धक्का, दडस वस्ती कुरवली येथील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल, जयकुमार शिंदे अन् युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी हाकेच्या अंतरावर एमआयडिसी होणार असून रोजगाराचा अन पाण्याचा प्रश्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुटला आहे - आमदार सचिन पाटील विरोधकांना त्यांची जागा दाखवा : आमदार सचिन पाटील : मुंजवडी येथील कोपरा सभा आम्ही शरद पवारांच्या छताडावर बसून रेल्वे नेली अन तुम्ही फक्त त्यांची चाटायचं काम केले - श्रीमंत रामराजेंवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बोचरी टीका स्व. माजी आमदार चिमणराव कदम यांनी बांधलेले उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊ दिले नाही अन त्यांचा पुत्र त्यांच्या वळचनीला गेलाय - झिरपवाडी येथे आमदार सचिन पाटील यांचे टिकास्त्र विडणी गणात सचिन अभंग अध्यक्ष यांची प्रचारात मोठी आघाडी, धुळदेव मध्ये तरुण वर्गाने केला विजयाचा निश्चय शिंदेमाळ गावानेच केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा विजय सोपा राजे गटाला कोळकीत जोरदार धक्का; युवा नेते अनुप गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जयकुमार शिंदे व युवराज सस्ते चेअरमन यांची प्रचारात आघाडी, गावागावातून होत आहे मोठ्या जल्लोषात स्वागत विडणी गणातील भाजप उमेदवार सचिन अभंग प्रचाराचा आज शुभारंभ फलटण हादरले! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निर्घृण खून प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड, स्वीकृतपदी सुदाम आप्पा मांढरे, अशोकराव जाधव फलटणच्या उपनगराध्यक्षपदी प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले यांची वर्णी लागण्याची चर्चा विष्णू लोखंडे यांनी वाठार निंबाळकर गटातून भरला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज निष्ठावंत शिवासैनीकांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला उमेदवारीच नाही, शिवसैनिक पालकमंत्री यांची तक्रार ना. एकनाथ शिंदे यांना करणार? मोठ्या गावातील लोकांना उमेदवारी दिली जाते, मग छोट्या छोट्या गावातील लोकांनी काय सतरंज्या उचलायच्या का? वाठार निंबाळकर येथे मंगळवार 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बिजोत्सव, व पालखी सोहळा पिंपरद उड्डाणपुलाखालचे खड्डे : लोक मेल्यावरच प्रशासन जागं होणार का? सुरवडी गणातून उद्योजक शंभूराज बोबडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी फलटण तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन क्षीरसागर यांची निवड विजयी खेचू शकलो नाही, पण खचलोही नाही; पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार – प्रसाद पवार - पाटील मागासवर्गीय विशेष कल्याण समिती नेमावी – नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे कष्ट, निर्भीड लेखणी आणि समाजसेवेचा अखंड प्रवास : ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे सांगवी गावात आदर्श काम केल्याने सनी मोरे यांच्या पत्नी सौ.मनिषाताई मोरे यांना विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी - जनतेतून मागणी

राखूया समतोल पर्यावरणाचा, तोच सन्मान निसर्गाचा      

टीम : धैर्य टाईम्स
निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी आपली वसुंधरा जपणे गरजेचे आहे. आपली वसुंधरा समृद्ध असावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ’माझी वसुंधरा अभियान 2.0’ ऑक्टोबर 2020 पासून सुरु केले. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित असलेले ’माझी वसुंधरा अभियान’ हे पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

 पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही दिसू लागल्याने याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने 1972 साली युनोच्या एका परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरले. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आणि संवर्धनाची गरज लक्षात घेऊन विविध प्रकल्प राबविले जात आहेत.  पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पर्यावरणाचे जतन, संवर्धन केले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी आपली वसुंधरा जपणे गरजेचे आहे. आपली वसुंधरा समृद्ध असावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ’माझी वसुंधरा अभियान 2.0’ ऑक्टोबर 2020 पासून सुरु केले. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित असलेले ’माझी वसुंधरा अभियान’ हे पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण संवर्धन - 
पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे संवर्धन या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. वायू तत्त्वाचे संवर्धन करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयात वाहन विरहित दिवस निश्‍चित करून सायकलचा वापर करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
जलतत्त्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण याचा समावेश आहे. अग्नी तत्त्वाशी संबंधित उर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतांचे बांध यासारख्या जागांवर राबवणे आणि आकाश या तत्त्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्‍चित करुन मानवी स्वभावांतील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमातून जनमानसात बिंबवणे या प्रमुख बाबींचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे. 
निसर्गपूरक जीवनपद्धती -
निसर्गाच्या या पंचतत्त्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करुन निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ’माझी वसुंधरा अभियान’  राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे अडीच लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
वृक्षगणना,रोपवाटिकेची निर्मिती,वृक्ष आराखडा,एकल वापर प्लास्टिक बंदी,घनकचरा व्यवस्थापन,जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन,ई-कचरा व्यवस्थापन,निगडीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या दिशेने पुढाकार, राडारोडा कचर्‍याचे व्यवस्थापन,कृषी कचरा व्यवस्थापन, उज्ज्वला योजना आणि गॅस जोडणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग,विहीर पुर्नस्थापना उपक्रम,पर्यावरणपूरक मूर्तीचा प्रचार,सौर ऊर्जेला प्रोत्साहन अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी निश्‍चितच मदत होणार आहे.
पुणे प्लॉगेथॉन 2022 -
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेतर्फे 5 जून रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत प्लॉगेथॉन (जॉगिंग विथ पिकिंग अप लिटर) मोहिम राबविण्यात येत आहे. व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकांना सकाळी फिरण्याची सवय असते.याला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान या जॉगर्सना लाभू शकेल. पुणे शहरातील एकूण 134 रस्ते यासाठी निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर विविध टेकड्या रामनदी,पुणे शहरातील विविध नदी घाट व क्रॉनिक्स स्पॉट या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. 
पर्यावरण आणि आपले नाते जिवाभावाचे आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतीचा केवळ निसर्ग नाही, तर हवा, पाणी, जमीन, वनस्पती या सर्वांनी मिळून पर्यावरण बनते. मानवाला जगण्यासाठी या सर्वांची गरज असते. त्यामुळे आपल्या सर्वांवर सर्वात मोठी जबाबदारी आहे ती पर्यावरण रक्षणाची. या जबाबदारीचे भान करून देण्यासाठीच पर्यावरण दिन आहे.

गीतांजली अवचट, माहिती सहायक,
विभागीय माहिती कार्यालय, पुणे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER