खींचो न कमानों को, न तलवार निकालो, जब तोप हो मुकाबिल तो अखबार निकालो। हा शेर अकबर इलाहाबादी त्यावेळी लिहिला होता ज्यावेळी इंग्रजांनी क्रूरपणे अन्याय अत्याचार चालवला होता. त्यावेळी अकबर इलाहाबादीनी वृत्तपत्रांना खूप मोठी ताकत म्हणून पहिले होते. याच पद्धतीने नेपोलियन ने म्हटले होते की चार विरोधी वृत्तपत्रांसमोर हजारो बंदुका सुद्धा निकामी आहेत.
दैनिक सम्राटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचत लेखणीच्या माध्यमातून तळपती लेखणी काय करू शकते हे महाराष्ट्राला दाखवून देणारे दैनिक सम्राट चे संपादक बबनराव कांबळे यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
खींचो न कमानों को, न तलवार निकालो, जब तोप हो मुकाबिल तो अखबार निकालो। हा शेर अकबर इलाहाबादी त्यावेळी लिहिला होता ज्यावेळी इंग्रजांनी क्रूरपणे अन्याय अत्याचार चालवला होता. त्यावेळी अकबर इलाहाबादीनी वृत्तपत्रांना खूप मोठी ताकत म्हणून पहिले होते. याच पद्धतीने नेपोलियन ने म्हटले होते की चार विरोधी वृत्तपत्रांसमोर हजारो बंदुका सुद्धा निकामी आहेत. दै.सम्राट च्या माध्यमातून बबनराव कांबळे यांनी महाराष्ट्र राज्यावर आपल्या झुंजार लेखणीने अधिराज्य गाजविले.
दलित चळवळीला कार्यकर्त्यांच्या श्रमाला घरा घरात पोहोचलेले एक दीपस्तंभ होता त्याच्या माध्यमातून संपूर्ण देशातील व महाराष्ट्र राज्यातील दलित चळवळीतील उपक्रम,दलितांवरील अन्याय याला न्याय मिळवून देण्याची जणू जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्रातील तमाम दलितांचे पालकत्व स्वीकारले. दलित चळवळीला ताकद देण्याचे, चळवळीतील कार्यकर्त्याला हक्काच व्यासपीठ म्हणून सम्राट ने राज्यात वेगळा विचार पोहोचवला.
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र बबनराव यांनी तयहयात जपला.



















